माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची तिकिटं आता 'बुक माय शो’वर उपलब्ध
Posted On:
04 DEC 2019 5:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 डिसेंबर 2019
भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट देण्यासाठी ऑनलाईन तिकिटं उपलब्ध करून देण्यासाठी फिल्म्स डिव्हिजन आणि ‘बुक माय शो’ यांच्यातील सामंजस्य करार करण्यात आला. फिल्म्स डिव्हिजनच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा आणि ‘बुक माय शो’च्या लाईव्ह एंटरटेनमेंटचे मुख्य परिचालक अधिकारी अल्बर्ट अल्मेडा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अतुल तिवारी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट देणाऱ्या चित्रपट रसिकांची संख्या वाढवणे हा या करारामागचा उद्देश असल्याचे तिवारी म्हणाले.
National Museum of Indian Cinema tickets now available on #BookMyShow
MoU signed today between @Films_Division and @bookmyshow , will help in increasing footfalls to the #NMIC : Shri Atul Tiwari, AS @MIB_India pic.twitter.com/cIfnYOKQnv
— PIB India (@PIB_India) December 4, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात मुंबईत फिल्म्स डिव्हिजन संकुलात उभारण्यात आलेल्या या संग्रहालयाचे उद्घाटन केले होते. या संग्रहालयामध्ये भारतीय चित्रपटाचा समृद्ध इतिहास दाखवण्यात आला आहे.

B.Gokhale/S.Kane/P.Kor
(Release ID: 1594961)
अभ्यागत कक्ष : 187