रेल्वे मंत्रालय
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा ‘योग्य खाद्य पदार्थ मिळणारे रेल्वे स्थानक’ म्हणून गौरव
प्रविष्टि तिथि:
03 DEC 2019 5:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2019
रेल्वे प्रवाशांना आरोग्यपूर्ण आणि योग्य अन्नपदार्थांचा पर्याय निवडण्यासाठी सहाय्य ठरणारी ‘योग्य खाद्य पदार्थ स्थानक मोहीम ’ रेल्वे मंत्रालयाने सुरू केली. एफएसएसएआय द्वारे 2018 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘इट राईट इंडिया’ मोहिमेचा हा एक भाग होता. या मोहिमेअंतर्गत मुंबईत सेंट्रल रेल्वे स्थानक देशातील पहिले ‘इट राईट स्टेशन’ ठरले आहे.

एफएसएसएआय द्वारे 29 नोव्हेंबर 2019 रोजी या रेल्वे स्थानकाला चार तारांकित प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
अन्न सुरक्षा आणि स्वच्छता, आरोग्यदायी पदार्थांची उपलब्धता, अन्नपदार्थ निर्मिती-वाहतूक आणि विक्रीची ठिकाणे, वाया जाणाऱ्या अन्नपदार्थांचे व्यवस्थापन, स्थानिक आणि ऋतूमानानुसार उपलब्ध होणारे खाद्यपदार्थ तसेच अन्न सुरक्षा आणि आरोग्यदायी आहार या गोष्टींची पूर्तता करण्याच्या आधारावर मुंबई सेंट्रलची निवड करण्यात आली आहे.
S.Tupe/J.Patankar/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1594737)
आगंतुक पटल : 154
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English