श्रम आणि रोजगार मंत्रालय

औद्योगिक संबंध संहिता विधेयक 2019 लोकसभेत सादर

Posted On: 28 NOV 2019 7:03PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर 2019

 

श्रम आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोष कुमार गंगवार यांनी आज लोकसभेत औद्योगिक संबंध संहिता विधेयक 2019 मांडले. श्रमिक संघटनांचे प्रतिनिधी, नोकरीदात्यांच्या संघटना आणि राज्य सरकारांसोबत विस्तृत चर्चा केल्यानंतर ही संहिता तयार करण्यात आल्याचे गंगवार यांनी सांगितले.

श्रमिक संघटनांशी संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करणे आणि ते अधिक मजबूत करणे, औद्योगिक आस्थापनांमधील स्थिती आणि औद्योगिक तंट्यांमध्ये तपास आणि ते सोडवणे हे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे.

श्रमिक संघटना कायदा 1926, औद्योगिक रोजगार (स्थायी आदेश) कायदा 1946 आणि औद्योगिक तंटे कायदा 1947 या तीन कामगार कायद्यांमधील संबंध तरतुदींचे एकत्रीकरण आणि सुलभीकरण केल्यानंतर संहितेचा मसुदा तयार करण्यात आला.

केंद्रीय मंत्रिमंडळाने 20 नोव्हेंबर 2019 ला औद्योगिक संबंध संहिता 2019 ला मंजुरी दिली.

 

G.Chippalkatti/S.Kakade/P.Kor

 


(Release ID: 1594115) अभ्यागत कक्ष : 150
Read this releasein: English