मंत्रिमंडळ
स्पेनमध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेकडे भारताच्या दृष्टिकोनास मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
27 NOV 2019 3:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज, 2 ते 13 डिसेंबर 2019 दरम्यान स्पेनच्या माद्रिद येथे (चिलीच्या अध्यक्षतेखाली) होणाऱ्या हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रांच्या यूएनएफसीसीसीच्या 25 व्या परिषदेच्या (सीओपी) संमेलनात भारताच्या वाटाघाटीच्या भूमिकेस मान्यता दिली.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर, भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करणार आहेत. कोप 25 ही एक महत्त्वपूर्ण परिषद आहे कारण देश क्योटो प्रोटोकॉल अंतर्गत पूर्व- 2020 कालावधीपासून नंतरच्या 2020 पॅरिस कराराच्या कालावधीत जाण्याची तयारी करीत आहे. यूएनएफसीसीसी आणि पॅरिस कराराची तत्त्वे आणि तरतुदींद्वारे तसेच विशेषत: समानता आणि सामान्य परंतु भिन्न जबाबदाऱ्या आणि प्रतिसाद क्षमतेच्या तत्त्वांनुसार (सीबीडीआर-आरसी) भारताच्या दृष्टीकोनाबाबत मार्गदर्शन केले जाईल.
हवामान बदलाबाबतचे भारताचे नेतृत्व जगभरात स्पष्ट आणि प्रसिध्द आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हवामान बदलांच्या समस्येस्चे निराकरण करण्यासाठी भारत सरकार अनेक उपक्रम राबवित आहे आणि हे उपक्रम हवामान कृतीबद्दलची भारताची वचनबद्धता आणि महत्वाकांक्षा दर्शवतात. संयुक्त राष्ट्र महासंघटनेने नुकत्याच आयोजित केलेल्या हवामान कृती शिखर परिषदेत पंतप्रधानांनी भारताचे नवीकरणीय उर्जेचे लक्ष्य 450 जीडब्ल्यू पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट असल्याची घोषणा केली आणि इक्विटी आणि सीबीडीआर-आरसीच्या तत्त्वांवर सर्वांनी जबाबदारीपूर्ण कारवाई करण्याची मागणी केली. आंतरराष्ट्रीय सौर युती (आयएसए) च्या माध्यमातून वाढीव सौर उर्जा क्षमता मिळविण्याच्या प्रयत्नात भारत संपूर्ण जगात आघाडीवर आहे.
हवामान कृतीवर जगाला एकत्र करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आयएसए व्यतिरिक्त दोन नवीन उपक्रमही भारताने सुरू केले आहेत.
भारत आपल्या कृतींमध्ये महत्वाकांक्षी आहे आणि विकसित देशांनी महत्वाकांक्षी कृती करण्यास पुढाकार घ्यावा आणि सन 2020 पर्यंत वर्षाला 100 अब्ज डॉलर्स जमा करण्याच्या त्यांच्या हवामान वित्त वचनबद्धता पूर्ण केल्या पाहिजेत आणि एनडीसीमार्फत पक्षाला भविष्यातील कारवाईची माहिती देण्यासाठी त्यांचे आर्थिक सहकार्य प्रगतीशील व मोठ्या प्रमाणात केले पाहिजे यावर जोर दिला आहे.
एकंदरीत, भारत विधायक आणि सकारात्मक दृष्टिकोनातून वाटाघाटी करण्यात आणि आपल्या दीर्घकालीन विकासाच्या हिताच्या दृष्टीने कार्य करण्यास उत्सुक आहे.
B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
(Release ID: 1593747)
Visitor Counter : 244