मंत्रिमंडळ
भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान धोरणात्मक भागीदारी परिषद स्थापन करण्याच्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने कार्योत्तर मंजुरी दिली
Posted On:
27 NOV 2019 3:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या स्थापनेसाठी 29 ऑक्टोबर, 2019 रोजी पंतप्रधानांनी केलेल्या कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे.
या करारामुळे उभय देशांतील उच्च पदस्थ नियमितपणे भेटू शकतील आणि धोरणात्मक भागीदारी अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रम / प्रकल्पांच्या प्रगतीवर नजर ठेऊ शकतील. यामुळे धोरणात्मक गुंतवणूकीसाठी नवीन क्षेत्रे शोधली जातील आणि उद्दीष्ट निश्चित केली जातील तसेच त्यातून मिळणारे फायदे परिभाषित केले जातील.
फायदे
कोणत्याही लिंग, वर्ग किंवा उत्पन्नाच्या मर्यादेपलीकडे जाऊन सौदी अरेबियाबरोबर सुधारित आर्थिक आणि व्यावसायिक संबंध असणार्या नागरिकांना लाभ मिळवून देणे हे या प्रस्तावाचे लक्ष्य आहे.
सौदी अरेबियाबरोबर झालेल्या या करारामुळे संरक्षण, सुरक्षा दहशतवादविरोधी , ऊर्जा सुरक्षा आणि नवीकरणीय ऊर्जा यासारख्या प्रमुख क्षेत्रात भागीदारीचे नवे मार्ग खुले होतील.
B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
(Release ID: 1593742)
Visitor Counter : 83