कायदा आणि न्याय मंत्रालय
संविधान दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम
सकाळी 11 वाजता प्रिॲम्बलचे सामूहिक वाचन
प्रविष्टि तिथि:
25 NOV 2019 6:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2019
संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारण्याच्या घटनेच्या 70व्या वर्षानिमित्त देशभरात वर्षभर विविध कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत. त्याचा प्रारंभ उद्या संविधान दिवसानिमित्त होणार आहे.
26 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी संविधान दिवस साजरा करण्यात येतो. संविधान दिवसानिमित्त उद्या सकाळी 11 वाजता दरवर्षीप्रमाणे सामूहिक प्रिॲम्बल (राज्यघटनेची उद्देशिका) वाचन केले जाणार आहे. या निमित्ताने देशभरात विविध चर्चा, परिसंवादांचे आयोजनही करण्यात आले आहेत.

संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात उद्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि संसदेचे सदस्य या कार्यक्रमात सहभागी होतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 24 नोव्हेंबर 2019 ला ‘मन की बात’ या कार्यक्रमात संविधान दिवसाचा उल्लेख केला होता.

G.Chippalkatti/S.Kakade/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1593471)
आगंतुक पटल : 244
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English