श्रम आणि रोजगार मंत्रालय

अटल बिमीत व्यक्ती कल्याण योजना

Posted On: 25 NOV 2019 6:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2019

 

31 मार्च 2019 पर्यंत कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत 3.49 कोटी व्यक्तींना लाभ मिळाला आहे. अटल बिमीत व्यक्ती कल्याण योजनेअंतर्गत सर्व निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्ती या योजनेतून मिळणाऱ्या लाभासाठी पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सप्टेंबर 2019 पर्यंत विमा उतरवलेल्या देशभरातील 58 जणांना 4 लाख 53 हजार 9 रुपयांची मदत देण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील 2 व्यक्तींचा समावेश असून, त्यांना 14 हजार 667 रुपयांची मदत देण्यात आली आहे.

केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोष कुमार गंगवार यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

G.Chippalkatti/J.Patankar/D.Rane



(Release ID: 1593459) Visitor Counter : 129


Read this release in: English