राष्ट्रपती कार्यालय

एनडीसीच्या 59व्या अभ्यासक्रमाच्या अध्यापक आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट

Posted On: 21 NOV 2019 5:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2019

 

राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय अर्थात एनडीसीच्या 59व्या अभ्यासक्रमाच्या अध्यापक आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची भेट घेतली.

कुठल्याही देशाचे यश हे त्या देशात उपलब्ध साधन संपत्तीचा किती प्रभावीपणे वापर केला जातो, यावर अवलंबून असते, असे राष्ट्रपती म्हणाले. मनुष्यबळ हे यामधे सर्वात महत्वाचे असून, राष्ट्रीय सुरक्षेसाठी मनुष्यबळ विकसित करण्याचे काम एनडीसीकडे सोपवण्यात आले आहे. ही संस्था केवळ सशस्त्र दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच प्रशिक्षित करीत नसून, परदेशी देशांच्या अधिकाऱ्यांनाही त्यांच्या देशांच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सक्षम करतात, असे राष्ट्रपती म्हणाले.

जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र दलांच्या भूमिकेचा विस्तार झाला आहे. भविष्यातील संघर्षासाठी बहु उद्देशीय आणि बहु संस्थात्मक दृष्टीकोनाची गरज असून, एनडीसी अभ्यासक्रम यात महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे, असे म्हणाले.

 

 

G.Chippalkatti/S.Kane/D.Rane

 

 



(Release ID: 1592880) Visitor Counter : 71


Read this release in: English