मंत्रिमंडळ
फार्मा सीपीएसयुच्या अंतिम निर्धारण / धोरणात्मक निर्गुंतवणुकीपर्यंत 103 औषधांच्या सध्याच्या सूचीमध्ये अल्कोहल आधारीत निर्जंतुकीकरण करणारे एक अतिरिक्त उत्पादन जोडून त्याच अटी आणि शर्तींसह सध्याच्या औषध खरेदी धोरणाच्या विस्तार आणि नवीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
20 NOV 2019 11:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने फार्मा सीपीएसयुच्या अंतिम निर्धारण / धोरणात्मक निर्गुंतवणुकीपर्यंत औषध खरेदी धोरणाच्या विस्तार आणि नवीकरणाला मंजुरी दिली.
प्रमुख प्रभाव
या धोरणाच्या मुदत वाढ आणि नवीकरणामुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या औषध कंपन्यांना त्यांच्या सध्याच्या सुविधांचा जास्तीत जास्त वापर करता येईल. तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी महसुल निर्माण करता येईल.
पार्श्वभूमी:
औषध खरेदी धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने 30 ऑक्टोबर 2013 रोजी 5 वर्षांसाठी मंजुरी दिली होती. या सूचीत 103 औषधांचा समावेश करण्यात आला होता. मात्र दरम्यानच्या काळात काही औषध कंपन्या बंद पडल्या, तर काही विकण्यात आल्या. त्यामुळे सध्याचे धोरण निर्गुंतणुकीपर्यंत सुरु ठेवण्याचा प्रस्ताव आहे.
G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
(Release ID: 1592776)
Visitor Counter : 109