पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांची भेट

Posted On: 20 NOV 2019 11:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्‍ट्रेलियाचे माजी पंतप्रधान  टोनी अबॉट यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी ऑस्‍ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यालगतच्या जंगलात लागलेल्या आगीतील जीवित आणि वित्त हानीबद्दल दुःख व्यक्त केले.

 टोनी अबॉट यांचा भारत दौरा आणि  गुरू नानक देवजी यांच्या प्रकाश पर्वाच्या 550व्या जयंतीनिमित्त त्यांनी सुवर्ण मंदिराला भेट दिल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांनी नोव्हेंबर 2014 मध्ये जी-20 शिखर परिषदेसाठी केलेल्या ऑस्‍ट्रेलिया दौऱ्याचे स्मरण केले आणि कॅनबेरा, सिडनी आणि मेलबार्न येथे झालेल्या द्विपक्षीय बैठकीचा उल्लेख केला. ऑस्ट्रेलियाच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केल्याचे त्यांनी स्मरण केले.

 भारतऑस्‍ट्रेलिया संबंध मजबूत करण्यात टोनी अबॉट यांनी पार पाडलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.

 

 

G.Chippalkatti/S.Kane/D.Rane

 



(Release ID: 1592679) Visitor Counter : 77


Read this release in: English