रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
फास्टटॅग लागू करण्याच्या प्रयत्नांना गती
Posted On:
18 NOV 2019 6:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2019
टोल प्लाझांवरील अडथळे दूर करण्यासाठी आणि विनाअडथळा वाहतुकीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल वसुली (फास्टटॅग) कार्यक्रम राबवत आहे.
1 डिसेंबर 2019 पर्यंत सर्व राष्ट्रीय महामार्गांवर दोन्ही दिशांना एका मार्गिकेचा अपवाद वगळता सर्व मार्गिका फास्टटॅग होणे आवश्यक आहे. या एका मार्गावर हायब्रीड पद्धतीने टोल वसूली जारी राहील.
1 नोव्हेंबर 2019 पासून काही राष्ट्रीय मार्गांवर चाचणी सुरु करण्यात आली आहे.
विविध बँका आणि आयएचएमसीएल / एनएचएआय द्वारा स्थापित 28,500 विक्री केंद्रांवरुन फास्टटॅग खरेदी करता येईल.
G.Chippalkatti/S.Kakade/D.Rane
(Release ID: 1592041)
Visitor Counter : 168