राष्ट्रपती कार्यालय

अटल टिंकरिंग लॅब मॅराथॉन 2018 मध्ये सहभागी झालेल्या निवडक विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली

Posted On: 14 NOV 2019 6:32PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2019

 

अटल टिंकरिंग लॅब मॅराथॉन 2018 मध्ये सहभागी झालेल्या निवडक विद्यार्थ्यांनी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.

देशातल्या 2700 शाळांमधल्या सुमारे 50,000 विद्यार्थ्यांमधून या विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रपतींनी संतोष व्यक्त केला. या विद्यार्थ्यांचा आविष्कार पाहून आपण प्रभावित झाल्याचे राष्ट्रपती म्हणाले. नेहमीपेक्षा वेगळा विचार करण्याची संधी मिळाल्यावर आपल्या देशातली मुले काय साध्य करू शकतात हे पाहून आश्चर्य वाटल्याचे राष्ट्रपती म्हणाले.

अटल नाविन्यता अभियान आणि अटल टिंकरिंग लॅबच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor(Release ID: 1591653) Visitor Counter : 81


Read this release in: English