अर्थ मंत्रालय
जीएसटीआर-9 आणि जीएसटीआर-9C अधिक सुलभ, प्रपत्र दाखल करण्याच्या मुदतीत वाढ
प्रविष्टि तिथि:
14 NOV 2019 6:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2019
2017-18 या आर्थिक वर्षासाठी जीएसटीआर-9 (वार्षिक विवरणपत्र) आणि जीएसटीआर 9C (रिकन्सीलिएशन स्टेटमेंट) हे फॉर्म दाखल करण्याची मुदत 31 डिसेंबर 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तर 2018-19 या वर्षासाठी ही मुदत 31 मार्च 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या फॉर्ममधले विविध भाग ऐच्छिक करून हे फॉर्म अधिक सुलभ करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.
या बदलामुळे आणि वाढीव मुदतीमुळे वस्तू आणि सेवा करदाते 2017-18 आणि 2018-19 या आर्थिक वर्षासाठी त्यांचे वार्षिक विवरणपत्र वेळेत भरू शकतील अशी केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाची अपेक्षा आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1591647)
आगंतुक पटल : 212
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English