अर्थ मंत्रालय

भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात सचिव स्तरावर द्विपक्षीय बैठक

Posted On: 13 NOV 2019 7:12PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2019

 

कर चुकवेगिरीच्या लढ्यात सहकार्य वृद्धींगत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष उएली मॉरट यांच्यात झालेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर कर विषयक माहितीचे जलद आदान-प्रदान करण्याच्या दृष्टीने दोन्ही बाजू बारकाईने काम करत आहेत.

हे सहकार्य वृद्धींगत करण्यासाठी महसूल सचिव डॉ. अजय भूषण पांडे आणि स्वित्झर्लंडच्या आंतरराष्ट्रीय वित्त विभागाच्या सचिव डॅनियेल स्टॉफेल यांच्यात आज चर्चा झाली. गेल्या काही वर्षात करविषयक प्रकरणात प्रशासकीय सहाय्य विशेषत: एचएसबीसी प्रकरणात मदत देण्यासाठी स्वित्झर्लंडने केलेल्या प्रयत्नांबाबत यावेळी दोन्ही पक्षांनी समाधान व्यक्त केले.

खात्यांविषयीच्या माहितीचे आपोआप आदान-प्रदान होणार असल्याने भारतीयांच्या स्वित्झर्लंडमध्ये असलेल्या सर्व बँक खात्याचा तपशील भारतीय कर प्रशासनाला मिळू शकणार असल्याने वित्तीय पारदर्शकतेचे नवे युग सुरू होणार आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1591502) Visitor Counter : 66


Read this release in: English