पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते एकात्मिक तपास नाक्याचे उद्‌घाटन आणि कर्तारपूर साहिब कॉरिडॉर येथून यात्रेकरुंचा पहिला चमू रवाना

Posted On: 09 NOV 2019 6:33PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुरुदासपूर, पंजाब येथे एकात्मिक तपास नाक्याचे उद्‌घाटन करण्यात आले तसेच भाविकांचा पहिला चमू रवाना करण्यात आला.

पंतप्रधानांनी कर्तारपूर कॉरिडॉर उदघाटनापूर्वी गुरु नानक देवजी यांच्याविषयीच्या डिजीटल प्रदर्शनाची आणि प्रवासी टर्मिनल इमारतीची पाहणी केली. तसेच त्यांनी भाविकांच्या पहिल्या चमूशी संवाद साधला. 

 

Prime Minister @narendramodi unveils Plaque and inaugurates historic #KartarpurCorridor in presence of Union Ministers @HarsimratBadal_ and @HardeepSPuri

The corridor will facilitate visit of devotees to Gurdwara Darbar Sahib in Kartarpur#GuruNanak550 pic.twitter.com/iwpKI0JJKO

— PIB India (@PIB_India) November 9, 2019

📡LIVE Now

PM @narendramodi inaugurates ICP, #KartarpurCorridor

Watch on #PIB's
YouTube: https://t.co/x72GAIK3vS
Facebook: https://t.co/p9g0J6q6qvhttps://t.co/5MoZd9eKaB#GuruNanak550

— PIB India (@PIB_India) November 9, 2019

एकात्मिक तपास नाका, कर्तारपूर कॉरिडॉर

एकात्मिक तपास नाक्यामुळे पाकिस्तानातील गुरुद्वारा कर्तारपूर साहिबला भेट देणाऱ्या भारतीय भाविकांची सुविधा होणार आहे.

भारताने पाकिस्तानसोबतच्या करारावर 24 ऑक्टोबर 2019 रोजी स्वाक्षरी केली आहे, त्यानूसार झिरो पॉईंट येथील कर्तारपूर साहिब कॉरिडॉर, आंतरराष्ट्रीय सीमा, डेरा बाब नानक यांच्या परिचालनाविषयीची कार्यपद्धती ठरवण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने  22 नोव्हेंबर 2018 रोजी ठराव पास करुन गुरु नानक देवजी यांची 550 वी जयंती देश आणि जगभर भव्य स्वरुपात साजरी करण्याचा निर्णय घेतला.

तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाने ठराव करुन डेरा बाबा नानक ते आंतरराष्ट्रीय सीमा यादरम्यान कर्तारपूर साहिब कॉरिडॉरचे बांधकाम अतिशय सहज आणि सुलभरित्या करण्यास परवानगी दिली.

भाविकांसाठी पुरवण्यात आलेल्या सुविधा.

अमृतसरपासून डेरा बाबा नानक ते गुरुदासपूर 4.2  किमी चार पदरी महामार्ग 120 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आला आहे.

अतिशय अत्याधुनिक अशी प्रवाशी टर्मिनल इमारत 15 एकर जागेत उभारण्यात आली आहे. विमानतळापासून जवळ असलेली इमारत वातानुकूलित असून दररोज 5000 भाविकांसाठी 50 इमिग्रेशन काऊंटर्स उभारण्यात आली आहेत.

या इमारतीमध्ये सर्व सुविधा जसे किऑस्कस, स्वच्छतागृह, बाल संगोपन, प्रथमोपचार, प्रार्थनेसाठी खोली आणि मुख्य इमारतीमध्ये खाद्यपदार्थ पुरविणारी काऊंटर्स उभारण्यात आली आहेत.

सुरक्षाव्यवस्था चोख असून सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. 

आंतरराष्ट्रीय सीमेवर 300 फुट राष्ट्रीय स्मारक ध्वज उभारण्यात आला आहे.

कर्तारपूर कॉरिडॉरसंबंधी पाकिस्तानसमवेत 24 ऑक्टोबर रोजी झालेल्या करारानूसार कर्तारपूर कॉरिडॉरच्या कार्यपद्धतीविषयीचा आराखडा ठरवण्यात आला आहे.

 

त्यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे

-भारतीय वंशाचे सर्व धर्मीय यात्रेकरुन कॉरिडॉरचा वापर करु शकतील

-व्हिसाशिवाय प्रवास करता येईल;

-यात्रेकरुंना वैध पासपोर्टवर प्रवास करता येईल;

-भारतीय वंशाच्या लोकांना पासपोर्टसोबत ओसीआय कार्ड जवळ बाळगावे लागेल;

-भारतीय वंशाच्या व्यक्तींनी त्यांच्या देशाच्या पारपत्रासह ओसीआय कार्ड ठेवणे आवश्यक आहे.

-भारतीय वंशाच्या व्यक्तींनी त्यांच्या देशाच्या पारपत्रासह ओसीआय कार्ड ठेवणे आवश्यक आहे.

- कॉरिडॉर सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालू राहील.

-सकाळी प्रवास करणाऱ्या यात्रेकरुंना त्याचदिवशी परत यावे लागेल.

-हा कॉरिडॉर काही अधिसूचित दिवस वगळता वर्षभर सुरु राहील, याबाबत पुर्व सूचना दिली जाईल.

-यात्रेकरुंना वैयक्तिकरित्या किंवा गटाने प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध आहे तसेच पायी प्रवास देखील करता येईल.

-प्रवासाच्या तारखेपूर्वी भारत पाकिस्तानकडे यात्रेकरुंची यादी पाठवेल. प्रवासाच्या तारखेपूर्वी चार दिवस यात्रेकरुंना कळवले जाईल. 

-लंगर आणि प्रसाद वितरणासाठी पुरेशी तरतूद करण्यात आल्याचे आश्वासन पाकिस्तानकडून भारताला करण्यात आले आहे.

 

नोंदणीसाठी पोर्टल:-

· कुठल्याही दिवशी प्रवास करण्यासाठी यात्रेकरुंनी prakashpurb550.mha.gov.in या पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करणे गरजेचे आहे. प्रवासाच्या तीन ते चार दिवस अगोदर यात्रेकरुंना नोंदणीबाबत एसएमएस किंवा ई-मेल द्वारे कळवले जाईल. इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन देखील तयार केले जाईल. प्रवासी टर्मिनल इमारतीत दाखल होणाऱ्या यात्रेकरुंकडे पारपत्रासह इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन असणे गरजेचे आहे. 

 

S.Thakur/P.Kor



(Release ID: 1591130) Visitor Counter : 86


Read this release in: English