रेल्वे मंत्रालय
रेल्वेला माहिती तंत्रज्ञान दृष्टीने सक्षम करण्यासाठी तीन ऑनलाईन ॲप्लिकेशन्सचा शुभारंभ
Posted On:
08 NOV 2019 6:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर 2019
रेल्वेची माहिती तंत्रज्ञान सक्षमता वाढवण्यासाठी तीन ऑनलाईन ॲप्लिकेशन्स सुरु करण्यात आली आहेत. ज्यामुळे रेल्वेच्या प्रकल्पांवर योग्य देखरेख ठेवण्यास मदत होईल तसेच डिजिटल इंडियाच्या स्वप्नाला चालना मिळेल. या तीन ॲप्लिकेशन्सची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:-
- सीआरएस सॅक्शन मॅनेजमेंट प्रणाली :- रेल्वेच्या मालमत्तेचे बांधकाम, देखभाल यामध्ये सीआरएस सॅक्शन हा महत्वपूर्ण घटक आहे. या सीआरएस सॅक्शन मॅनेजमेंटसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले असून लेवल क्रॉसिंग आणि छोट्या पुलांशी संबंधित कामांचा यात समावेश आहे.
- रेल रोड क्रॉसिंग जीएडी ॲप्रूवल प्रणाली :- रेल्वे मंत्रालय आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पुलांवरील आणि पुलांखालील बांधकामासाठी ऑनलाईन ई-शासन मंच विकसित केला आहे.
- टीएमएस फॉर कन्स्ट्रक्शन :- नव्याने बांधण्यात येणाऱ्या मालमत्तांसाठी हे ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1591058)
Visitor Counter : 150