गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्र्यांच्या हस्ते आयसीएटी येथे नवीन परिक्षण सुविधेचे उद्घाटन
Posted On:
08 NOV 2019 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर 2019
केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री अरविंद सावंत यांनी आज आंतरराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान केंद्रात नवीन परिक्षण सुविधेचे उद्घाटन केले. हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनांच्या तांत्रिक लाभांबाबत माहिती देण्यासाठी तंत्रज्ञान प्रशंसा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. देशासाठी धोरण आखताना भारताने ग्राहकांच्या स्थानिक गरजांवर लक्ष केंद्रीत करायला हवे असे सावंत यांनी यावेळी सांगितले. अन्य देशांसाठी सुसंगत असणारे उपाय भारतासाठी सुसंगत असू शकणार नाहीत यावर त्यांनी भर दिला. भारताकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ असून त्यांच्या रोजगार सुरक्षेकडे लक्ष द्यायला हवे असे ते म्हणाले. ई-कचऱ्याचे व्यवस्थापन ही मोठी समस्या बनली असून कच्च्या तेलाऐवजी लिथियमची आयात केली जावू नये असे मतही त्यांनी व्यक्त केले.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1591050)