गृह मंत्रालय

ऑस्ट्रेलियात ‘नो मनी फॉर टेरर’ मंत्रिस्तरीय परिषदेसाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय प्रतिनिधी मंडळ सहभागी

Posted On: 07 NOV 2019 5:06PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर 2019

 

ऑस्ट्रेलियात मेलबर्न येथे सुरू असलेल्या ‘नो मनी फॉर टेरर’ या मंत्रिस्तरीय परिषदेत केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय प्रतिनिधी मंडळ सहभागी झाले आहे. पुढल्यावर्षी ‘नो मनी फॉर टेरर’ परिषदेचे यजमानपद भारत भूषवेल, अशी घोषणा रेड्डी यांनी या परिषदेत केली. काही देश दहशतवादी संघटनांना अर्थसहाय्य पुरवत असल्याबद्दल रेड्डी यांनी भारताच्या चिंता उद्‌घाटन सत्रात अधोरेखित केल्या. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या आणि निधी पुरवणाऱ्यांविरोधात सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी ठरावामध्ये पुढील चार मुद्दे समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मांडला.

  1. दहशतवाद हा शांतता, सुरक्षा आणि विकासाला सर्वात मोठा धोका आहे.
  2. संयुक्त राष्ट्रांतर्गत आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक ठरावाला अंतिम स्वरुप देण्याला गती देण्यात यावी.
  3. एफएटीएफ मानकांची प्रभावीपणे अंमलबजावणी आवश्यक
  4. कट्टरतावादाचे अर्थसहाय्य रोखण्याबाबत चर्चा सुरू करणे.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor



(Release ID: 1590883) Visitor Counter : 144


Read this release in: English