पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान मोदी आणि व्हिएतनामच्या पंतप्रधानांची भेट

Posted On: 04 NOV 2019 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनामचे पंतप्रधान नेग्युन झुआन फुंक यांची 4 नोव्हेंबर 2019 रोजी बँकॉक येथे भेट घेतली. भारत-आसियान शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.

या वेळी दोन्ही नेत्यांनी भारत-व्हिएतनाम मधल्या ऐतिहासिक आणि परंपरागत मैत्रीपूर्ण संबंधाचा पुनरुच्चार केला. हे द्विपक्षीय संबंध सांस्कृतिक तसेच परस्पर विश्वास तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भक्कम सहकार्यावर आधारित असण्यावरही जोर देण्यात आला.

दोन्ही देशांदरम्यानच्या नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीदरम्यान संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील बंध अधिक मजबूत करण्यावर आणि आर्थिक आणि व्यापारी क्षेत्रात निकटचे संबंध प्रस्थापित करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

सागरी क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावरही या वेळी भर देण्यात आला. तसेच दहशतवाद आणि मूलतत्ववादाचा मुकाबला करण्यासाठी एकत्रित कार्य करण्याबाबतही सहमती झाली.

भारत-प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता, सुरक्षा आणि भरभराट व्हावी यासाठी कार्य करण्याचा दोन्ही देशांनी पुनरुच्चार केला.

2020 मध्ये आसियानचे अध्यक्ष असून व्हिएतनाम बरोबर कार्य करायला तयार असल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.

B.Gokhale/J.Patankar/P.Malandkar

 



(Release ID: 1590427) Visitor Counter : 97


Read this release in: English