संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज रशिया भेटीसाठी होणार रवाना
Posted On:
04 NOV 2019 5:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2019
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लष्कर तसेच लष्करी तंत्रज्ञान सहकार्याबाबतच्या 19 व्या भारत-रशिया आंतर शासकीय आयोगाच्या बैठकीसाठी रशियाला भेट देणार आहेत. ते येत्या 5 ते 7 नोव्हेंबर 2019 दरम्यान होणाऱ्या बैठकीच्या सह-अध्यक्षपदी असतील.
या भेटीत राजनाथ सिंह रशियाचे संरक्षण मंत्री जनरल सर्जई शोअूगु यांच्याशी लष्करी सहकार्य तसेच संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याबाबत विस्तृत चर्चा करतील.
रशियाचे उद्योग आणि व्यापार मंत्री डेनिस मँटूरोव्ह यांच्यासह राजनाथ सिंह ‘भारत-रशिया संरक्षण उद्योग सहकार्य परिषदे’चे उद्घाटन करतील. या परिषदेत भारत आणि रशियादरम्यान संरक्षण उद्योग सहकार्याला चालना देणे, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण आणि ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाअंतर्गत भारतातल्या संरक्षण उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक याबाबत विशेष चर्चा होईल.
या भेटी दरम्यान राजनाथ सिंह सेंट पीट्सबर्गला भेट देणार असून दुसऱ्या महायुद्धादरम्यान मृत्यूमुखी पडलेले नागरिक आणि जवान यांच्या स्मृतीस्थळी आदरांजली अर्पण करतील तसेच रशियन संरक्षण उत्पादन कारखान्याला भेटही देतील.
N.Sapre/J.Patankar/P.Malandkar
(Release ID: 1590318)
Visitor Counter : 163