पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान मोदी – इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष भेट
प्रविष्टि तिथि:
03 NOV 2019 6:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 नोव्हेंबर 2019 रोजी बँकॉक येथे आसियान शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांची भेट घेतली.
इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विडोडो यांचे अभिनंदन केले. जगातील सर्वाधिक मोठी लोकशाही असलेले दोन देश अर्थात भारत आणि इंडोनेशिया, विविध क्षेत्रातील सहकार्यासाठी कटिबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. शांतता, संरक्षण आणि समृद्धी या क्षेत्रात तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सागरी सहकार्याकरता एकत्रित कार्य करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. दहशतवाद आणि मूलतत्ववाद या बाबत दोन्ही नेत्यांनी विस्तृत चर्चा केली आणि या धोक्याचा सामना करण्यासाठी द्विपक्षीय तसेच जागतिक पातळीवर एकत्रित कार्य करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली.
औषधं निर्मिती, वाहन उद्योग आणि कृषी उत्पादनं आदी भारतीय वस्तूंसाठी बाजारपेठेच्या अधिक सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज तसेच द्विपक्षीय व्यापार वृद्धिंगत करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. भारतीय कंपन्यांनी इंडोनेशियात केलेल्या मोठ्या गुंतवणुकीची दखल घेत इंडोनेशियातल्या कंपन्यांनी भारतात गुंतवणुकीसाठी असलेल्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
पुढच्या वर्षी सर्व सहमतीने अनुकूल असणाऱ्या काळात राष्ट्रपती विडोडो यांना भारत भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमंत्रण दिले.
इंडोनेशियासोबतच्या द्विपक्षीय संबंधांना भारत अग्रक्रमाने प्राधान्य देत आहे. यावर्षी भारत-इंडोनेशिया दरम्यान राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याचा 70 वा वर्धापन दिन साजरा होत आहे.
B.Gokhale/J.Patankar/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1590264)
आगंतुक पटल : 82
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English