पंतप्रधान कार्यालय
वायू प्रदुषणाला आळा घालण्यासंदर्भात पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी पंजाब, हरियाणा आणि दिल्ली राज्यांसोबत घेतली बैठक
Posted On:
03 NOV 2019 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर 2019
पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी.के.मिश्रा यांनी पंजाब, हरियाणा आणि दिल्ली राज्यातल्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासंदर्भात चर्चा केली. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील वायू प्रदुषणामुळे निर्माण झालेल्या आणीबाणी सदृश्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.
या बैठकीत शेतीचे खुंट जाळणे, बांधकामं, कचरा जाळणे आणि औद्योगिक तसेच वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदुषणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या राज्यातील परिस्थितीवर राजीव गौबा दररोज आढावा घेतील असा निर्णयही घेण्यात आला. या राज्यातल्या जिल्ह्यांमधील परिस्थितीवर रात्रं दिवस लक्ष ठेवण्याचे निर्देश राज्यातल्या मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.
या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या कृतीबाबत राज्यांच्या मुख्य सचिवांनी विस्तृत माहिती द्यावी असे निर्देश केंद्र सरकारने यावेळी दिले.
दिल्लीतील वायू प्रदुषणाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी सात औद्योगिक क्षेत्र आणि मोठ्या रहदारीच्या क्षेत्रात सुमारे 300 पथकं तैनात करण्यात आली आहेत.
B.Gokhale/J.Patankar/P.Malandkar
(Release ID: 1590262)
Visitor Counter : 151