पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान मोदी यांनी घेतली जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांची भेट

Posted On: 04 NOV 2019 3:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांची भेट घेतली. बँकॉकमधल्या पूर्व आशिया शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. पुढील महिन्यात होणाऱ्या भारत-जपान वार्षिक परिषदेसाठी पंतप्रधान ॲबे यांचे स्वागत करण्याकरता उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. आगामी वार्षिक परिषदेच्या यशाामुळे भारत-जपान दरम्यानची विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारी अधिक विकसित व्हायला मदत होईल असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

दोन्ही देशादरम्यानच्या वाढत्या आर्थिक सहकार्याचे उभय नेत्यांनी स्वागत केले. मुंबई-अहमदाबाद दरम्यानच्या अति जलद रेल्वे प्रकल्पाच्या प्रगतीचा दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला.

या वर्षी होणारी भारत-जपान वार्षिक परिषद आणि भारत-जपान द्विपक्षीय चर्चा यांचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.  

नियमावर आधारित तसेच खुलं आणि सर्वसमावेशक भारत-पॅसिफिक क्षेत्र विकसित करण्याप्रती दोन्ही पंतप्रधानांनी आपली कटिबद्धता पुन्हा व्यक्त केली.  

 

 

 

B.Gokhale/J.Patankar/P.Malandkar


(Release ID: 1590260) अभ्यागत कक्ष : 138
Read this releasein: English