पंतप्रधान कार्यालय

‘हॅलो पीएम मोदी’ समुदाय संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण


‘तिरुक्कुरल’चे थाई भाषांतर आणि गुरु नानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त विशेष नाण्याचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

भारत-म्यानमार-थायलंड दरम्यानच्या त्रिपक्षीय महामार्गाचा संपूर्ण प्रदेशाच्या विकासासाठी लाभ : पंतप्रधान

Posted On: 02 NOV 2019 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2019

 

थायलंडच्या बँकॉक येथे झालेल्या हॅल्लो पीएम मोदीकार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित भारतीय समुदायाशी संवाद साधला. संपूर्ण थायलंडमधील हजारो भारतीय लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

भारत-थायलंडमधील ऐतिहासिक संबंध :

पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित प्रेक्षकांचे विविध भारतीय भाषांमध्ये स्वागत करत थायलंडमधील भारताच्या विविधतेचा गौरव केला. भारत-आसियान परिषदेत सहभागी होण्यासाठीचा म्हणून  हा आपला पहिलाच औपचारिक थायलंड दौरा आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. भारत आणि थायलंडदरम्यानच्या प्राचीन ऐतिहासिक संबंधाना त्यांनी उजाळा दिला.

 दोन्ही देशांच्या सांस्कृतिक  जीवनशैलीतल्या साम्यामुळे दोन्ही देशात आजही उत्तम सबंध आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

आपण ज्या देशात जातो, तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्याचा आपला प्रयत्न असतो, असे पंतप्रधानानी सांगितले. या देशात राहणारे भारतीय दोन्ही देशांमधील संस्कृती आणि परंपरा यांचे दूत आहेत, असेही मोदी म्हणाले.

तिरुक्कुरलचा थाई अनुवाद आणि गुरु नानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त विशेष नाण्याचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

तिरुवल्लीवल या तमिळ लेखकाचा प्राचीन ग्रंथ तिरुक्कुरलच्या थाई भाषेतील अनुवादाचे पंतप्रधानाच्या हस्ते यावेळी प्रकाशन झाले. जीवन कसे जगावे याचे प्रत्यक्ष धडे देणारे हे पुस्तक आहे,

असे मोदी यावेळी म्हणाले. गुरु नानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त विशेष नाण्याचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन देखील पंतप्रधानांच्या हस्ते झाले. गुरु नानक यांची शिकवण आजही  संपूर्ण मानवजातीसाठी लागू आहे, येत्या 9 नोव्हेंबरपासून कर्तारपूर कॉरिडोरच्या माध्यामातून थेट कार्तारापूरशी संपर्क प्रस्थापित होईल असे सांगत सर्वांनी तिथे दर्शनासाठी जाण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केले.

  पर्यटनाला चालना आणि पूर्वेकडील देशांशी संबंध वाढवण्यासाठी प्रयत्न

पर्यटनाला चालना देण्यासाठी बुद्ध सर्किट विकसित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत,असे पंतप्रधान म्हणाले. जागतिक पर्यटन आणि प्रवासाच्या क्रमवारीत भारत गेल्या चार वर्षात 18 व्या स्थानावर पोचला आहे.

 भारत, परंपरा, अध्यात्मिक आणि वैद्यकीय पर्यटन वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितल. त्याशिवाय पर्यटनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यावर भर दिला जातो आहे, असेही ते म्हणाले.

भारताच्या पूर्वेकडील परराष्ट्र धोरणाविषयी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की ईशान्य भारताचा थायलंडशी अधिकाधिक संपर्क वाढावा म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. हा प्रदेश ईशान्य आशियाचे  प्रवेशद्वार म्हणून विकसित व्हावा, म्हणून प्रयत्न सुरु आहेत, असेही त्यांनी सांगितले. भारत-म्यानमार-थायलंड दरम्यानच्या त्रिपक्षीय महामार्गामुळे सर्व देशात संपर्क व्यवस्था मजबूत होण्यासोबतच  संपूर्ण प्रदेशाच्या विकासाला चालना मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले.

जनतेच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध :

लोकशाहीसाठी भारताच्या कटिबद्धतेचा उल्लेख करत, पंतप्रधानानी भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकीची माहिती उपस्थितांना दिली.

गेल्या काही दिवसात सरकारने घेतलेल्या काही महत्वपूर्ण निर्णयांची माहिती पंतप्रधानानी दिली. यात कलम 370 रद्द करणे, घराघरात स्वयंपाकाचा गैस पुरवणे, आयुष्यमान भारत योजनेचा लाभ यांचा  समावेश होता. वर्ष 2022 पर्यत देशातील सर्व घरांपर्यत पिण्याचे पाणी पोचवण्यास सरकर कटिबद्ध आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

 

B.Gokhale/R.Aghor/D.Rane

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1590206) Visitor Counter : 75


Read this release in: English