पंतप्रधान कार्यालय

बँकॉक येथे झालेल्या 16 व्या भारत-आसियान शिखर परिषदेत पंतप्रधान उपस्थित

Posted On: 03 NOV 2019 5:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 नोव्‍हेंबर 2019

थायलंडच्या बँकॉक येथे झालेल्या 16 व्या आसियान-भारत शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

या परिषदेत बोलतांना पंतप्रधानानी 16 व्या आसियान-भारत शिखर परिषदेत सहभागी होता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. थायलंडने केलेल्या आदरातिथ्याविषयी आभार व्यक्त करतानाच पुढच्या वर्षीच्या शिखर परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल त्यांनी व्हिएतनामला शुभेच्छा दिल्या.

पूर्वेकडील देशांशी संबंध हा भारत-प्रशांत महासागर धोरणाचा महत्वाचा भाग आहे,तसेच आसियान या धोरणाच्या केंद्रस्थानी आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. एका भक्कम आसियानचा भारताला नक्कीच लाभ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अवकाश, सागरी क्षेत्र, हवाई आणि डिजिटल संपर्क यंत्रणा सुधारण्यासाठी भारताने उचललेल्या पावलांची पंतप्रधानानी माहिती दिली. प्रत्यक्ष आणि डिजिटल संपर्कयंत्रणा सुधारण्यासाठी भारताने दिलेल्या एक अब्ज डॉलर्सचा कर्जाचा उपयोग होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.  

गेल्या वर्षी झालेल्या आसियान शिखर परिषदेचा आणि सिंगापूर येथे झालेल्या अनौपचारिक शिखर परिषदेचा त्यांनी उल्लेख केला. या परिषदेत घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीमुळे भारत आणि आसियान राष्ट्रे अधिक जवळ आली आहेत. ही भागीदारी अधिक दृढ करत परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी भारत इच्छुक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. विशेषतः कृषी, संशोधन, अभियांत्रिकी, विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारत सहकार्य करेल, अशी ग्वाही पंतप्रधानानी दिली.

सागरी सुरक्षा आणि नील अर्थव्यवस्था या क्षेत्रात भारताला आसियान देशांशी अधिक मजबूत सहकार्य आणि संबंध हवे आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. भारत-आसियान एफटीएचा आढावा घेण्याच्या निर्णयाचे स्वागत करत यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक भागीदारी वृद्धींगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

       

Narendra Modi@narendramodi

Addressing the India-ASEAN Summit in Bangkok. Watch. https://www.pscp.tv/w/cI5XCTMyMjExNTJ8MXJteFBYcllCa0R4Tr3z4RHwJk89p0W6GKDBrO86IL5dQwKIKzgx40AnQBAi …

Narendra Modi @narendramodi

Addressing the India-ASEAN Summit in Bangkok. Watch. #ASEAN2019

pscp.tv

9,321

9:03 PM - Nov 2, 2019

Twitter Ads info and privacy

2,278 people are talking about this

                                                                                      

 

B.Gokhale/ R.Aghor/D.Rane 



(Release ID: 1590168) Visitor Counter : 114


Read this release in: English