अर्थ मंत्रालय
ऑक्टोबर महिन्यात 95,380 कोटी रुपयांचा सकल वस्तू आणि सेवा कर महसूल जमा
प्रविष्टि तिथि:
01 NOV 2019 5:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2019
ऑक्टोबर 2019 या महिन्यामध्ये 95,380 कोटी रुपयांचा सकल जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर महसूल जमा झाला. यामध्ये सीजीएसटी 17,582 कोटी रुपये, एसजीएसटी 23,674 कोटी, आयजीएसटी 46,517 कोटी (आयातीवरच्या21,446 कोटी रुपयांसह) आणि उपकर 7,607 कोटी (आयातीवरच्या 774 कोटी रुपयांसह).
2018 च्या ऑक्टोबरच्या तुलनेत ऑक्टोबर 2019 या महिन्यात महसूलात 5.29 टक्के घट झाली. मात्र 2018 च्या एप्रिल-ऑक्टोबर या काळाशी तुलना करता 2019 च्या एप्रिल-ऑक्टोबर या काळात देशांतर्गत घटकांनी 6.74 शतांश टक्के वृद्धी दर्शवली आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1589984)
आगंतुक पटल : 127
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English