पंतप्रधान कार्यालय

केवडिया येथे 94 व्या नागरी सेवा फांउडेशन अभ्यासक्रमाच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींशी पंतप्रधानांनी साधला संवाद

Posted On: 31 OCT 2019 5:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या केवडिया येथे कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीने आयोजित केलेल्या 94 व्या नागरी सेवा फांउडेशन अभ्यासक्रमाच्या 430 अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. ‘आरंभ’ या आठवडाभर चालणाऱ्या आगळ्या सर्वंकष फाऊंडेशन अभ्यासक्रमाविषयी पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. यावेळी अधिकारी प्रशिक्षणार्थींनी कृषी आणि ग्रामीण सबलीकरण, आरोग्य सेवा सुधारणा आणि धोरण आखणी, शाश्वत ग्रामीण व्यवस्थापन तंत्र, समावेशक नागरीकरण आणि शिक्षण विषयक भवितव्य या पाच विषयांवर सादरीकरण केले.

जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हीड मालपास, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव आणि इन्स्टीट्युट ऑफ फिचर ॲन्ड युनिर्व्हसिटी ऑफ डायर्व्हसिटी इथले तज्ञ आणि विश्लेषकांशी झालेल्या विविध सत्रांबाबतही पंतप्रधानांना माहिती देण्यात आली.

भारतीय नागरी सेवेचे संस्थापक मानले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 31 ऑक्टोबर या जयंतीदिनी हा अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला आहे. ही प्रशंसनीय बाब असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

भारतीय नागरी सेवा सरदार पटेल यांची ऋणी आहे. केवडिया येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या ठिकाणाहून आपल्या देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा आपल्याला मिळो. भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर होण्याच्या दिशेने आपण सर्व काम करुया असे पंतप्रधान म्हणाले.

प्रशासनात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असणारा आणि भविष्यकेंद्री असा ‘आरंभ’ फाउंडेशन अभ्यासक्रम हा आगळा असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

देश आणि भविष्य केंद्रस्थानी ठेवून ‘आरंभ’ ची आखणी करण्यात आली आहे. यामुळे लोक एकत्रितपणे समावेशक पद्धतीने काम करतील. काही वेळा परिभाषेत बदल केल्यास, हा बदल अधिकाऱ्यांच्या समस्यांकडे, समग्र विचारांकडे बघण्याच्या दृष्टीकोनात बदल घडवून आणण्यात उपयोगी ठरतो. पूर्वीच्या मागास राहिलेल्या जिल्ह्यांना आता आकांक्षी जिल्हे असे संबोधले जाते. अशा जिल्ह्यांमध्ये बदली झाल्यास त्याकडे शिक्षा म्हणून न पाहता संधी म्हणून का पाहू नये असे पंतप्रधान म्हणाले. अधिकारी, प्रशिक्षणार्थींनी दाखवलेली निष्ठा आणि त्यांच्या नवकल्पनांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. जागतिक उत्तम प्रथा आणि तंत्रज्ञानावर आधारित या आगळ्या प्रशिक्षण अभ्यासक्रमामुळे सार्वजनिक प्रशासन आणि धोरण आखणी या क्षेत्रात काम करताना त्याचा फायदा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आपण कोणीही आणि कुठेही असलो तरी राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपण एकत्र काम करायला हवे असे पंतप्रधान म्हणाले.    

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1589815) Visitor Counter : 165


Read this release in: English