संरक्षण मंत्रालय

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राजनाथ सिंह यांनी दिली एकतेची शपथ

Posted On: 31 OCT 2019 4:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2019

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण मंत्रालयातल्या वरिष्ठ लष्करी आणि नागरी अधिकाऱ्यांना आज एकतेची शपथ दिली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 144 व्या जयंतीनिमित्त एकसंध आधुनिक भारताच्या या शिल्पकाराचे त्यांनी स्मरण केले. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी संरक्षण मंत्र्यांसह उपस्थितांनी शपथ घेतली.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संरक्षणमंत्र्यांनी इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 


(Release ID: 1589786) अभ्यागत कक्ष : 102
Read this releasein: English