कायदा आणि न्याय मंत्रालय

न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती

Posted On: 29 OCT 2019 3:50PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2019

 

राष्ट्रपतींनी देशाच्या सरन्यायाधीशपदी शरद अरविंद बोबडे यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती 18 नोव्हेंबर 2019 पासून लागू होईल.

न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे  12 एप्रिल 2013 पासून सर्वोच्च न्यायालयात कार्यरत आहेत. यापूर्वी 16 ऑक्टोबर 2012 पासून सहा महिन्यांसाठी ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी होते. तसेच त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून 29 मार्च  2000 पासून आणि नियमित रुपाने 28 मार्च 2002 पासून काम पाहिले आहे.

न्यायमूर्ती बोबडे यांचा जन्म  24 एप्रिल 1956 रोजी झाला, तर 13 सप्टेंबर 1978 रोजी त्यांनी वकील म्हणून नोंदणी केली. त्यांनी नागपूर उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय तसेच प्रासंगिकरित्या मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात नागरी, घटनात्मक, श्रम, कंपनी, निवडणूक आणि करविषयक बाबींमध्ये त्यांनी काम पाहिले आहे. राज्यघटना, प्रशासकीय, कंपनी, पर्यावरण आणि निवडणूक कायद्यांमध्ये त्यांचे प्राविण्य आहे.

 

S.Thakur/P.Kor


(Release ID: 1589447) Visitor Counter : 173


Read this release in: English