संरक्षण मंत्रालय
इंडो-फ्रेंच संयुक्त सराव शक्ती 2019
प्रविष्टि तिथि:
28 OCT 2019 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2019
भारत-फ्रान्स यांच्या सैन्य दलांचा द्विपक्षीय प्रशिक्षण सराव ‘शक्ती 2019’ राजस्थानमध्ये येत्या 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या सरावासाठी फ्रेंच सैन्यदलाची तुकडी 26 ऑक्टोबरला भारतात दाखल झाली आहे.
दहशतवाद विरोधी कारवाईवर या सरावात लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान शारिरीक तंदुरुस्ती, परस्परांकडून उत्तम कवायती शिकण्यावर भर दिला जाईल. दोन्ही देशातल्या सैन्यदलात सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने हा संयुक्त सराव आयोजित करण्यात आली आहे.
D.Wankhede/N.Chitale/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1589395)
आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English