राष्ट्रपती कार्यालय

राजगीरमधल्या विश्वशांती स्तुपच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाला राष्ट्रपतींनी केले संबोधित

Posted On: 25 OCT 2019 5:14PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2019

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बिहारमधल्या राजगीर येथे विश्वशांती स्तुपच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाला संबोधित केले.

विश्वशांती स्तुप हा एकता, शांतता आणि अहिंसेचे प्रतीक आहे, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले. याच्या संदेशात सार्वत्रिक साम्य आहे जे संस्कृती, धर्म आणि भौगोलिक सीमांपलिकडचे आहे. भारत आणि जपान या शांतताप्रिय लोकशाही देशांमधील भागीदारी आणि सहकार्याचे प्रतिबिंब यात उमटते, असे ते म्हणाले.

बुद्धांच्या अष्टांगी मार्गाने केवळ जगातल्या अध्यामिक परिदृश्यचं बदलले नाही तर नैतिक आणि सामाजिक, राजकीय तसेच व्यावसायिक पद्धतींनाही प्रोत्साहन दिले असे राष्ट्रपती म्हणाले. बुद्धांचा संदेश जगभरातील त्यांच्या 50 कोटी अनुयायांपर्यंत पोहोचणार आहे. अधिकाधिक लोकांना बुद्धांच्या आदर्शांशी जोडणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. बुद्धांशी संबंधित ठिकाणांना वारसा पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहित करणे हा लोकांना विशेषत: तरुणांना बौद्ध धर्माकडे आकर्षित करण्याचा प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.

शांतता ही विकासाची पूर्व अट आहे, गरीबी आणि संघर्ष कमी करण्यासाठी शांतता आणि एकतेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor


(Release ID: 1589223) Visitor Counter : 123
Read this release in: English