रेल्वे मंत्रालय
सणासुदीच्या काळात, प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी रेल्वेकडून सुमारे 2500 विशेष फेऱ्या
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाच्या स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये अतिरिक्त रेल्वे सुरक्षा दल कर्मचारी तैनात
प्रविष्टि तिथि:
25 OCT 2019 2:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2019
सध्याच्या सणासुदीच्या काळात प्रवाशांना कुटुंबासह आपल्या गावी जाऊन सण उत्साहात साजरे करता यावेत यासाठी रेल्वेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने दुर्गापूजा ते नाताळ या कालावधीत विशेष गाड्यांच्या 2500 फेऱ्या सुरू केल्या आहेत. तसेच नियमित गाड्यांमध्ये अतिरिक्त डबेही जोडण्यात आले आहेत. दिल्ली-पाटणा, दिल्ली-कोलकाता, दिल्ली-मुंबई, मुंबई-लखनौ, चंदिगढ-गोरखपूर, दिल्ली-छपरा, हरिद्वार-जबलपूर सारख्या प्रमुख मार्गांवर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाची मदत घेतली जात आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रमुख स्थानकांवर रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक उपलब्ध आहेत.
B.Gokhale/S.Kane/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1589185)
आगंतुक पटल : 112
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English