मंत्रिमंडळ

लेखा वित्त आणि अंकेक्षण ज्ञान आधारित क्षेत्रांमध्ये भारत आणि कुवैत दरम्यान सामंजस्य करारला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 23 OCT 2019 7:31PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने, भारत आणि केएएए  दरम्यान क्षमतावृद्धी, वित्त, अंकेक्षण ज्ञान आणि लेखा ही क्षेत्रे बळकट करण्यासाठी केलेल्या सामंजस्य कराराला मंजुरी दिली.

 

फायदे:

१. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया अर्थात आय सी ए आय आणि कुवैत  अकाउंट्स अँड ऑडिटर्स असोसिएशन अर्थात केएएए या दोन संस्था सर्व तांत्रिक कार्यक्रमांचे, परिषदांचे कार्यशाळांचे कुवैतमध्ये आयोजन करतील. त्यामुळे दोन्ही  संघटनांच्या सदस्यांना फायदा मिळणार असून त्यांच्या व्यावसायिक अनुभवाचाही विकास होईल. प्रत्येक कार्यक्रमाचा खर्च या दोन्ही संस्था  वाटून घेतील.

२. आयसीएआय आणि केएएए या दोन्ही संस्था परस्पर सहकार्य करून कार्पोरेट गव्हर्नंस, तंत्रज्ञान संशोधन आणि सल्ला,दर्जा आश्वासन, फॉरेन्सिक लेखा, लघु आणि मध्यम आकाराच्या प्रॅक्टिसेस, इस्लामिक  फायनान्स, निरंतर व्यावसायिक विकास आणि इतर विषय हे परस्परांच्या आवडीनुसार ठरविले जातील.

३. या सामंजस्य करारांतर्गत, प्रस्तावित तरतुदींमध्ये आयसीएआय आणि केएएए यांच्यातील चर्चेनुसार, संभाव्य भविष्य विकास सामंजस्याने ठरवले जातील. याअंतर्गत बहिर्गत अधिनियम आणि स्वनियामक चौकट बनविली  जाईल.

४. कुवैतमध्ये आयसीएआय आणि के ए ए ए यांच्या सदस्यांना लेखा, अंकेक्षण या क्षेञात प्रशिक्षण मिळावे यासाठी  लघु कालावधीचे व्यावसायिक अभ्यासक्रम दोन्ही देशांकडून ठरविले जातील.

५. आयसीएआय आणि केएएए यांनी परस्पर सहकार्याने निवडक क्षेत्रात कार्य करण्यासाठी आवश्यक पावले आणि मापदंड ठरवली आहेत.

६. मध्य-पूर्व विभागात आयसीएआयचे सहा हजार सदस्य आहे आयसीएआय ही मोठी सदस्य संख्या असलेली बळकट संस्था असून केएएए  मदत करण्यासाठी तसेच एमसीएच्या सदस्याद्वारे या विभागाला अतिरिक्त लेखा माहिती मिळावी यासाठी आयसीएच्या सदस्यातर्फे सहकार्य देण्यात येणार आहे.

 

B.Gokhale/P.Kor


(Release ID: 1588957) Visitor Counter : 168
Read this release in: English