संरक्षण मंत्रालय
तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबत डीआरडीओने केले 30 करार
Posted On:
18 OCT 2019 4:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2019
डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने 16 भारतीय कंपन्यांबरोबर तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी 30 करार केले आहेत. यामध्ये 3 स्टार्ट अपचा समावेश आहे. गोव्यात 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान आयोजित व्हायब्रंट गोवा जागतिक प्रदर्शन आणि शिखर परिषदे दरम्यान हे करार करण्यात आले.
डीआरडीओ सशस्त्र दलांसाठी तंत्रज्ञान विकसित करते आणि ते संरक्षण उद्योगाकडे हस्तांतरीत केले जाते.
भारतीय सशस्त्र दलांना संरक्षण क्षेत्रातल्या या उद्योगांकडून ‘रेडी टू इट जेवण’, तसेच लहरी हवामानात तग धरण्यासाठी भारतीय सशस्त्र दलाच्या जवानांना ही उत्पादने उपयोगी पडतात. या उत्पादनांचे पोषण मूल्य उच्च दर्जाचे असून, अनेक महिने टिकते.
B.Gokhale/S.Kane/D.Rane
(Release ID: 1588461)