मंत्रिमंडळ
जम्मू आणि काश्मीरसाठी पंतप्रधानांच्या विकास पॅकेज 2015 अंतर्गत पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर आणि छांब मधल्या विस्थापित कुटुंबांसाठी मंत्रिमंडळाने 30.11.2016 रोजी मंजूर केलेल्या पुनर्वसन पॅकेजमधे 5,300 विस्थापित कुटुंबांचा समावेश करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
Posted On:
09 OCT 2019 5:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2019
जम्मू आणि काश्मीरसाठी पंतप्रधानांच्या विकास पॅकेज 2015 अंतर्गत पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर आणि छांब मधल्या विस्थापित कुटुंबांसाठी मंत्रिमंडळाने 30.11.2016 रोजी मंजूर केलेल्या पुनर्वसन पॅकेजमधे 5,300 विस्थापित कुटुंबांचा समावेश करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. या विस्थापित कुटुंबांनी जम्मू आणि काश्मीर मधून बाहेर जाण्याचा निर्णय सुरुवातीला घेतला होता, मात्र नंतर ते जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थायिक झाले होते.
लाभ:
या मंजूरीमुळे ही विस्थापित कुटुंब सध्याच्या योजने अंतर्गत साडेपाच लाख रुपये आर्थिक सहाय्य मिळण्यास पात्र ठरतील, तसेच त्यांना कायम स्वरुपी उत्पन्न देखील मिळेल.
जम्मू आणि काश्मीर मधे 1947 साली पाकिस्तानी संग्रामात 31,619 कुटुंबांनी पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधून जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थलांतर केले होते. त्यापैकी 26,319 कुटुंब जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थायिक झाली तर 5,300 कुटुंबांनी सुरुवातीला देशाच्या अन्य भागात जाण्याचा निर्णय घेतला होता. पुढे 1965 आणि 1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान छांब नियाबात परिसरातून आणखी 10,065 कुटुंब विस्थापित झाली यापैकी 3,500 कुटुंब 1965 च्या युद्धादरम्यान तर 6,565 कुटुंब 1671 च्या युद्धादरम्यान विस्थापित झाली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने 30.11.2016 रोजी मंजूरी दिलेल्या पॅकेज अंतर्गत 36,384 विस्थापित कुटुंबांना सामावून घेण्यात आले. यापैकी 26,319 कुटुंब पाक व्याप्त जम्मू-काश्मीरमधून, तर 10,065 छांब नियाबात परिसरातून विस्थापित झाली होती. पाक व्याप्त जम्मू-काश्मीरमधील 5,300 कुटुंब ज्यांनी देशाच्या अन्य भागात जाण्याचा निर्णय सुरुवातीला घेतला होता. त्यांचा या पॅकेज मध्ये समावेश करण्यात आला नव्हता. आता या कुटुंबांचा या पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे.
N.Sapre/S.Kane/D.Rane
(Release ID: 1587544)
Visitor Counter : 188