पंतप्रधान कार्यालय

आयुष्मान भारतमुळे छत्तीसगडमधील 21 वर्षाच्या मुलाचे वाचले प्राण


गरीबांसाठी डबल व्हॉल्व्ह (दुहेरी झडप) रिप्लेसमेंट आता सहज शक्य

Posted On: 01 OCT 2019 9:19PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2019

 

21 वर्षीय संजय व्हर्गम याला 14 फेब्रुवारी 2019 रोजी गेल्या एक ते दोन  वर्षात छातीत दुखणे, धाप लागणे, चक्कर येणे तसेच श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पूर्ण तपासणीनंतर त्याला हृदयात डबल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटची गरज असल्याचे निदान झाले.

अतिशय गरीब कुटुंबातील असल्यामुळे डॉक्टरांनी लिहून दिलेले उपचार घेणे त्याला परवडणारे नव्हते त्यामुळे तो आणि त्याचे कुटुंब निराश होऊन त्यांच्या गावात परत गेले. मात्र, खेड्यात गेल्यानंतर त्यांना PM-JAY योजनेची माहिती मिळाली आणि संजय आणि त्याच्या कुटुंबियांसाठी ते वरदानच ठरले. या शस्त्रक्रियेसाठी एरवी दोन लाख रुपये खर्च आला असता मात्र PM-JAY  अंतर्गत 18 फेब्रुवारी 2019 रोजी त्याच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

सध्या तो वेदनामुक्त असून आनंदी आणि आरोग्यदायी आयुष्य जगत आहे.

पंतप्रधानांना जगातल्या सर्वाधिक मोठ्या (10.74 कोटी लाभार्थी) आरोग्य योजनेच्या यशोगाथा सांगणाऱ्या 31 जणांमध्ये त्याचा समावेश होता.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत 16 हजार 85 हॉस्पिटलचा समावेश असून आतापर्यंत 41 लाख लाभार्थ्यांवर उपचार करण्यात आले असून 10 कोटींहून अधिक ई-कार्ड वितरित करण्यात आली आहेत.

आयुष्मान भारत अंतर्गत देशभरात 20 हजार 700 हून अधिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत.

 

M.Chopade/J.Patankar/P.Kor



(Release ID: 1587133) Visitor Counter : 67


Read this release in: English