अर्थ मंत्रालय

अर्थमंत्र्यांनी अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांना दिली स्वच्छतेची शपथ


एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टीकचे सर्व क्षेत्रातून उच्चाटन करण्याचा व्यक्त केला निर्धार

Posted On: 01 OCT 2019 3:37PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2019

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना आज स्वच्छतेची शपथ दिली. एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टीकचे सार्वजनिक/अधिकृत आणि व्यक्तिगत आयुष्यातून उच्चाटन करण्याची मोहीम राबविण्यासाठी अर्थमंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.

‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहीम अर्थमंत्रालयातर्फे 11 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2019 या काळात राबवण्यात येत आहे. भारताला एकदाच वापर होणाऱ्या प्लॅस्टीकपासून मुक्त करणे आणि जागृती निर्माण करणे ही या मोहिमेची संकल्पना आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्‍ट 2019 रोजी केलेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यातील भाषणात महात्मा गांधीजींची 150 वा जयंती दिन असलेल्या 2 ऑक्टोबर 2019 पासून भारताला एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टीकपासून मुक्त करण्यासाठी मोहीमेची घोषणा केली होती. 27 सप्टेंबर 2019 रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेतील भाषणात पंतप्रधानांनी ही मोहीम राबवण्याचा पुनरूच्चार केला होता.

या कार्यक्रमात केंद्रीय अर्थसचिव राजीव कुमार यांनी केवळ एकदाच वापर होणाऱ्या प्लॅस्टीकचा वापर पूर्णपणे बंद करण्यासाठी आणि टाळण्यासाठी हाती घेण्यात येणाऱ्या काही पावलांची माहिती दिली.

  • बैठकीत वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्लॅस्टीकच्या बाटल्यांऐवजी काचेच्या बाटल्या आणि पेले वापरणे.
  • प्लॅस्टीक फोल्डरऐवजी पुनर्वापर झालेले कागदाचे फोल्डर वापरणे.
  • वापरुन झाल्यावर विल्हेवाट लावण्यात येणारे प्लॅस्टीक कप/बशा यांचा कमीत कमी वापर
  • अधिकाऱ्यांमध्ये प्लॅस्टीकच्या नकारात्मक परिणामाबाबत जागृती निर्माण करणे आणि पर्यावरणस्नेही तसेच विघटन होणाऱ्या साहित्याचा वापर करणे आदी पर्यायांचा समावेश होता.

 

M.Chopade/J.Patankar/P.Kor



(Release ID: 1586833) Visitor Counter : 64


Read this release in: English