पंतप्रधान कार्यालय

संयुक्त राष्ट्र आम सभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी घेतली सायप्रसच्या राष्ट्रपतींची भेट

प्रविष्टि तिथि: 26 SEP 2019 7:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2019

 

संयुक्त राष्ट्र आम सभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रसचे राष्ट्रपती निकोस ॲनास्टॅसिॲडीस यांची भेट घेतली.

सायप्रसच्या राष्ट्रपतींच्या सप्टेंबर 2018 मधील भारत दौऱ्याच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या व्यापक पैलुंबाबत चर्चा केली.

2018-19 मध्ये द्विपक्षीय व्यापार 464 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतका होता. दोन्ही देशांची अर्थ व्यवस्थेची क्षमता आणि सामर्थ्य लक्षात घेता द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीत वाढ करण्याची गरज असल्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी सायप्रस सरकारचे आभार मानले. सायप्रसचे स्वातंत्र्य, सार्वभौमित्व, प्रांतिय अखंडता आणि एकतेसाठी भारताचा कायम पाठिंबा असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या मुद्यासह प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या मुद्यांवर त्यांनी चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी सायप्रसच्या राष्ट्रपतींना आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 


(रिलीज़ आईडी: 1586409) आगंतुक पटल : 90
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English