पंतप्रधान कार्यालय

महात्मा गांधींची आजच्या युगात प्रासंगिकता;संयुक्त राष्ट्राच्या ECOSOC चेंबर मध्ये पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 25 SEP 2019 6:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2019

 

महासचिव अँटोनियो गुटेरेस

अध्यक्ष मून

पंतप्रधान ली

पंतप्रधान शेख हसीना

पंतप्रधान अँड्र्यू होलिनेस

पंतप्रधान आर्डर्न

पंतप्रधान लोटय शेरिंग

मान्यवर, मित्रांनो

महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती निमित्त, आजच्या युगात त्यांची प्रासंगिकता या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण सर्व एकत्र जमलो आहोत.

तुम्हा सर्व विशेष पाहुण्यांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो.

महात्माजींच्या 150व्या जयंती निमित्त त्यांच्या स्मरणार्थ युएन ने टपाल तिकीट जारी केले त्यासाठी मी त्यांचे विशेष आभार मानतो.

गांधीजी भारतीय होते, परंतु केवळ भारताचे नव्हते. आज हे व्यासपीठ त्याचे जिवंत उदाहरण आहे. इतिहासात असे कुठेच  पाहायला मिळत नाही जिथे एखादया व्यक्तीचा प्रशासनाशी दूरवर काही संबंध नसतो आणि ती व्यक्ती सत्य आणि अहिंसेच्या शक्तीने शेकडो वर्षांपूर्वीच्या साम्राज्याला केवळ हादरवूनच सोडत नाही, तर देशभक्तांच्या हृदयात स्वातंत्र्याचा उत्साह देखील निर्माण करते.

महात्मा गांधी असेच होते. सत्तेपासून इतके दूर राहून देखील आजही ते करोडो लोकांच्या मनावर राज्य करत आहेत.

तुम्ही कल्पना करू शकता जे कधी गांधीजींना भेटले नाहीत ते देखील त्यांच्या जीवनापासून प्रभावित झाले. मार्टिन लुथर किंग ज्युनियर असो किंवा मग नेल्सन मंडेला, यांच्या विचारांचा आधार महात्मा गांधी होते, गांधीजींचा दृष्टिकोन होता.

मित्रांनो,

आज लोकशाहीच्या व्याख्येचा अर्थ मर्यादित झाला आहे, लोकांनी आपल्या आवडीचे सरकार निवडून द्यायचे आणि सरकारने जनतेच्या अपेक्षेनुसार काम करायचे. परंतु महात्मा गांधींनी लोकशाहीच्या खऱ्या शक्तीवर जोर दिला होता. त्यांनी लोकांना दिशा दाखवली होती ज्यात लोकांनी सरकारवर अवलंबून न राहता स्वावलंबी व्हावे असे सांगितले होते.

मित्रांनो,

महात्मा गांधी, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे केंद्रबिंदू होते परंतु क्षणभरासाठी आपण असा विचार करूया की गांधीजी जर स्वतंत्र भारतात जन्माला आले असते तर त्यांनी काय केले असते?

 त्यांनी स्वातंत्र्याची लढाई लढली ही बाब तर महत्वाची आहेच पण गांधीजींच्या कार्याचा विस्तार इतकाच मर्यादित नाही.

महात्मा गांधींनी एक अशी समाज व्यवस्था निर्माण करण्याचा विडा उचलला होता, जी सरकारवर अवलंबून राहणार नाही.

महात्मा गांधींनी परिवर्तन घडवले हे तर सर्वांनाच माहीत आहे परंतू लोकांनी स्वतःहून परिवर्तन घडवून आणावे यासाठी त्यांनी लोकांची आंतरिक शक्ती जागृत केली.

स्वातंत्र्य लढ्याची जबाबदारी जरी गांधीजींवर नसती तरी देखील स्वराज्य आणि स्वावलंबनानाच्या तत्वांसोबत ते नेहमी पुढे चालत राहिले.

भारतासमोरील मोठ्यातील मोठ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी गांधीजींचा हाच दृष्टिकोन  आज सहाय्यक ठरत आहे.

मागील पाच वर्षात आम्ही लोकसहभागाला प्राधान्य दिले आहे. स्वच्छ भारत अभियान असुदे, डिजिटल इंडिया असुदे आता लोकं स्वतःहून या सर्व अभियानाचे नेतृत्व करत आहेत.

मित्रांनो,

महात्मा गांधीजी सांगायचे, त्यांचे जीवन हाच त्यांचा संदेश आहे. गांधीजींनी कधीच स्वतःहून त्यांच्या आयुष्याचा प्रभाव पाडण्याचे प्रयत्न केले नाही परंतु त्यांचे आयुष्यच प्रेरणेचे कारण बनले. आज पण प्रभावित कसे करायचे या  संभ्रमित  युगात जगत आहोत परंतु गांधीजींचा दृष्टिकोन होता – प्रेरणादायी कसे व्हायचे.

गांधीजींची लोकशाही प्रति जी निष्ठा होती त्या संदर्भातील एक वाक्य मी तुम्हाला सांगू इच्छितो. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांना भेटलो होतो तेव्हा त्यांनी भावुक होऊन मला एक रुमाल दाखवला होता. तो खादीचा रुमाल होता, जो गांधीजींनी त्यांच्या लग्नात त्यांना भेट म्हणून दिला होता.

विचार करा, ज्यांच्या सोबत सिद्धांताची लढाई होती, त्यांच्या सोबतचे संबंध किती संवेदनशील होते. ते त्यांचे विरोधक तसेच त्यांच्या सोबत स्वातंत्र्य लढयात सहभागी झालेल्या सगळ्यांचेच कल्याण चिंतायचे, त्यांचा आदर करायचे.

मित्रांनो,

सिद्धांतांसोबत असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेमुळेच त्याचे लक्ष  अशा  विकृतींकडे गेले, ज्यांच्या प्रति सगळ्यांनी जागरूक असायला हवे. त्या आहेत-

कामाशिवाय संपत्ती

विवेकविना सुख

चारित्र्याशिवाय ज्ञान

नीतीविना व्यवसाय

मानवताविना विज्ञान

त्यागाविना धर्म

तत्त्वाशिवाय राजकारण

हवामान बदल असु दे किंवा मग दहशतवाद, भ्रष्टाचार असो किंवा स्वार्थी सामाजिक जीवन, गांधीजींचे हे सिद्धांत आपल्याला मानवतेच्या संरक्षणासाठी नेहमीच मार्गदर्शकाचे कार्य करतात.

गांधीजींनी दाखवलेला हा मार्ग सर्वोत्तम जगाच्या निर्मितीमध्ये प्रेरणादायी सिद्ध होईल याचा मला विश्वास आहे.

मला असे वाटते की, जोवर मानवतेसोबत गांधीजींच्या विचारांचा प्रवाह निरंतर वाहत राहील तोवर गांधीजींची  प्रेरणा आणि प्रासंगिकता देखील आपल्या सोबत असेल.

पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो!

धन्यवाद!

 

 

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane

 



(Release ID: 1586399) Visitor Counter : 1891


Read this release in: English