भारतीय निवडणूक आयोग
हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूका तसेच भविष्यातल्या सर्व निवडणुकांमध्ये सोशल मिडियाकडून स्वेच्छेने नैतिक आचार संहितेचे पालन केले जाणार
Posted On:
26 SEP 2019 6:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2019
इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने (आयएएमएआय) हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूका, पोटनिवडणूका तसेच भविष्यातल्या सर्व निवडणुकांमध्ये सोशल मिडियाकडून स्वेच्छेने नैतिक आचारसंहितेचे पालन करायला आपल्या सदस्यांच्यावतीने सहमती दर्शवली आहे. आयएएमएआय आणि फेसबुक, व्हॉट्स अप, ट्विटर, गुगल, शेअर चॅट आणि टिकटॉक सारख्या समाज माध्यमांनी 17व्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी स्वेच्छेने नैतिक आचारसंहितेचे पालन केले होते. या संघटनेने निवडणूक आयोगाला निवडणूका मुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
आयोगाच्या आवाहानानंतर सर्व प्रमुख समाज माध्यमे आणि आयएएमएआयने एकत्र येऊन स्वेच्छेने नैतिक आचारसंहिता आखली होती. 20 मार्च 2019 पासून ती लागू झाली. निवडणुकीच्या काळात समाज माध्यमांनी आचारसंहिता उल्लंघनाच्या 909 तक्रारींवर कारवाई केली.
स्वैच्छिक-नैतिक आचारसंहितेची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे:
- निवडणुकीचे नियम आणि अन्य संबंधित सूचनांबाबत जनजागृती करण्यासाठी सोशल मिडिया स्वेच्छेने माहिती, शिक्षण आणि संवाद मोहिमा हाती घेणार.
- निवडणूक आयोगाकडून आलेल्या तक्रारींवर त्वरीत कारवाई करण्यासाठी सोशल मिडियाने समर्पित तक्रार निवारण यंत्रणा तयार केली आहे.
- सोशल मिडिया आणि निवडणूक आयोगाने अधिसूचना प्रणाली विकसित केली आहे, ज्याद्वारे निवडणूक आयोग लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 126 आणि अन्य नियमांच्या संभाव्य उल्लंघनाबाबत सोशल मिडियाला अधिसूचीत करु शकतो.
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोशल मिडियावरील सर्व राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणिकरण आणि देखरेख समितीकडून प्रमाणित होऊन आल्याची खात्री सोशल मिडिया करुन घेईल.
- पेड राजकीय जाहिरातींमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सोशल मिडिया वचनबद्ध आहे.
20 मार्च 2019 पासून लागू झालेल्या स्वैच्छिक आचारसंहितेचा मसुदा पुढील लिंकवर उपलब्ध आहे.
Click here to see the attachment
N.Sapre/S.Kane/D.Rane
(Release ID: 1586318)
Visitor Counter : 299