पंतप्रधान कार्यालय
ब्लुमबर्ग जागतिक व्यापार मंचाला पंतप्रधानांनी संबोधित केले
Posted On:
25 SEP 2019 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज न्यूयॉर्क येथे ब्लुमबर्ग जागतिक व्यापार मंचाच्या बैठकीत प्रमुख भाषण केले.
या बैठकीच्या निमित्ताने भारताच्या विकास गाथेच्या भविष्यातील दिशेबाबत बोलण्याची संधी लाभली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. लोकशाही, लोकसंख्या, मागणी आणि निर्णायक क्षमता या चार स्तंभांवर भारताची विकास गाथा आधारीत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
देशातील राजकीय स्थैर्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला लाभ झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
सरकारने केलेल्या यशस्वी सुधारणांना जागतिक मान्यता मिळाल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांकातील मानांकनात 10 अंकांची झेप, जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात 13 अंकांची झेप, जागतिक अभिनवता निर्देशांकात 24 अंकांची झेप, तसेच व्यापार सुलभता निर्देशांकात 65 अंकांची सुधारणा आदींचा उल्लेख त्यांनी केला.
पंतप्रधानांनी ब्लुमबर्ग नॅशनल ब्रँड ट्रॅकर 2018 च्या अहवालाचा उल्लेख करतांना सांगितले की, या अहवालात जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्यात भारत हा अव्वल आशियाई अर्थ व्यवस्था असल्याचे म्हटले आहे. या अहवालाच्या राजकीय स्थैर्य, चलन स्थिरता, उच्च दर्जाची उत्पादने, भ्रष्टाचाराला आळा, उत्पादनाची कमी किंमत, धोरणात्मक ठिकाण आणि IPR प्रति आदर या 10 पैकी 7 निकषांनुसार भारत अव्वल स्थानावर आहे.
तंत्रज्ञान आणि नाविण्यपूर्ण संशोधनासंदर्भात पंतप्रधानांनी जागतिक व्यापार समुदायाला भारतात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले. त्यांचे तंत्रज्ञान आणि भारताची बुद्धिमत्ता एकत्रितपणे जग बदलवू शकतात आणि भारताच्या कौशल्याच्या मदतीने जागतिक आर्थिक विकासाला गती देऊ शकतील, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांच्या भाषणानंतर ब्लुमबर्गचे संस्थापक मायकेल ब्लुमबर्ग यांच्याशी संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
R.Tidke/S.Kane/D.Rane
(Release ID: 1586277)
Visitor Counter : 90