पंतप्रधान कार्यालय
गुजरात येथील सरदार सरोवर धरण येथे आयोजित नमामि नर्मदा महोत्सवात पंतप्रधानांचा सहभाग
प्रविष्टि तिथि:
17 SEP 2019 7:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरात मधिल केवडिया येथे नमामि नर्मदा महोत्सवात आज उपस्थित होते. हा महोत्सव गुजरात सरकारने 138.68 मीटर एवढा जल साठा या धरणामध्ये साठल्या प्रित्यर्थ हा महोत्सव आयोजित केला.
वर्ष 2017 मध्ये या धरणाची उंची वाढवल्यानंतर आज 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी या धरणातील जलसाठा ने अत्युच्च पातळी गाठली.पंतप्रधानांनी धरणावर जाऊन नर्मदेची पूजा केली आणि गुजरातची जीवन रेषा असलेल्या नर्मदा नदीच्या जलाचे स्वागत केले.
त्यानंतर पंतप्रधानांनी केवडीया येथील खालवनी इको-टुरिझम, कॅक्टस गार्डनला भेट दिली. केवाडिया येथील फुलपाखरांच्या बगीच्यामध्ये पंतप्रधानांनी टोपलीभर फुलपाखर बगीच्यामध्ये उडवलेत. त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी येथील एकता नर्सरीला सुद्धा भेट दिली. त्यानंतर पंतप्रधानांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे एका जाहीर सभेला संबोधित केले.
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आज सरदार सरोवर धरणात 138 मीटर जलपातळी बघून मला अत्यानंद झाला आहे. सरदार सरोवर धरण म्हणजे गुजरातच्या लोकांचं आशेचा किरण आहे. हे धरण म्हणजे लक्षावधी शेतकऱ्यांना वरदान ठरलेले आहे.
पंतप्रधानांनी सांगितले की, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला अकरा महिन्यांमध्ये तेवीस लाख देश विदेशातील पर्यटकांनी भेट दिली असून, सरासरी दहा हजार पर्यटक प्रत्येक दिवशी या ठिकाणी भेट देतात. ही एक जादू आहे असेही पंतप्रधान म्हणाले. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 31 ऑक्टोबर 2018 रोजी भारताच्या पहिल्या गृहमंत्र्यांच्या जन्मतिथि निमित्त लोकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारताच्या एकता आणि उत्कृष्टते साठी भारत मातेचे पुत्र सदैव सेवेत असुन आम्ही गेल्या शंभर दिवसात दिलेला शब्द पाळला आहे. नवीन सरकार पूर्वीच्या सरकारपेक्षा अधिक सक्षमतेने आणि जलद गतीने काम करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
B.Gokhale/ P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1585932)
आगंतुक पटल : 220
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English