राष्ट्रपती कार्यालय

मंगोलियाच्या राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ आयोजित मेजवानी प्रसंगी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केलेले भाषण

Posted On: 21 SEP 2019 6:40PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2019

 

1. महोदय, मी भारत दौऱ्यात तुमचे स्वागत करतो. तुमचे आणि तुमच्या  प्रतिनिधिमंडळाचे स्वागत करणे आमच्यासाठी सन्मान आहे. राष्ट्रपति भवनात वास्तव्य करण्याचे माझे निमंत्रण स्वीकारून तुम्ही हा दौरा अधिकच खास केला आहे.  आपल्या प्राचीन परंपरा आपल्याला आपल्या अतिथींचे केवळ मनापासून स्वागत करायला शिकवत नाहीत तर "अतिथि देवो भव" च्या भावनेने आदर करायलाही शिकवते. शतकानुशतके आपल्यात असलेले मैत्रीपूर्ण संबंध साजरे करण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल तुमचे आभारी आहोत.

2. भारत आणि मंगोलिया दरम्यान घनिष्ठ सांस्कृतिक संबंध आहेत. बौद्ध वारसा आणि आध्यात्मिक परंपराआपल्याला एकत्र बांधतात.आपली लोकशाही आणि स्वातंत्र्याची तत्वे समान आहेत.  तुमचा दौरा आपलया  धोरणात्मक भागीदारीचा महत्वपूर्ण मैलाचा दगड आहे.तुमचा हा दौरा आपले मैत्रीपूर्ण संबंध आणखी वृद्धिंगत करेल.

3. महामहिम, शतकानुशतके सुरु असलेले आपल्या लोकांमधील आदान-प्रदान आपल्या संबंधांचा कणा आहे. भारतातील बौद्ध भिक्षु आणि व्यापारी शांतता, सद्भावना आणि मैत्रीचा संदेश घेऊन मंगोलियाला गेले. त्याचप्रमाणे, काळानुरूप मंगोलियाचे विद्वान आणि यात्रेकरू बौद्ध अध्ययन आणि आध्यात्मिक लाभ प्राप्त करण्यासाठी भारतात आले. ही परंपरा निरंतर सुरु आहे. सुमारे 800 मंगोलियाचे विद्यार्थ्यां बौद्ध अध्ययन करत असून भारतासाठी ही विशेष बाब आहे. 

4. राष्ट्रपति, आपण दोन्ही देशांनी आपले बौद्ध संबंध जतन करण्याचे आणि पुढे नेण्याचे चांगले काम केले आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांनी  संवाद थ्री: शांतिपूर्ण सह -अस्तित्व, आंतर -धार्मिक ज्ञान आणि  अंतर-निर्भर स्थैर्यासाठी जागतिक स्तरावर चर्चेचे आयोजन केले होते.  महामहिम, आज सकाळी तुम्ही आणि आमच्या पंतप्रधानांनी संयुक्तपणे उलनबटोर मधील ऐतिहासिक गंदन बौद्ध मठात भगवान बुद्धाच्या पुतळ्याचे अनावरण केले.  त्यांनी नेहमी आपल्यला मार्गदर्शन करावे आणि आपल्यावर कृपादृष्टी ठेवावी.

5. महामहिम, भारत आणि मंगोलिया केवळ "आध्यात्मिक शेजारी" नाहीत तर धोरणात्मक भागीदार देखील आहेत. आम्ही तुमच्या तृतीय शेजार धोरणाची प्रशंसा करतो. जागतिक मुद्द्यांवर विचारांचा संगम आपली  धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत आणि अर्थपूर्ण बनवतो.

6. 2015 मध्ये आमच्या पंतप्रधानांच्या ऐतिहासिक मंगोलिया दौऱ्यानंतर संरक्षण, सुरक्षा, संस्कृति, माहिती तंत्रज्ञान, अंतराळ आणि नवीकरणीय ऊर्जा सह विविध क्षेत्रात आपले सहकार्य दृढ झाले आहे. क्षमता निर्मिती आणि  प्रशिक्षण क्षेत्रात मंगोलियाचे भागीदार असल्याचा आम्हाला आनंद होतो. मंगोलियात आम्ही निर्माण करत असलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प आपल्या विकास भागीदारीचे शानदार उदाहरण आहे.

7. महामहिम, मंगोलियाने जगाला अनेक महत्‍वपूर्ण सिद्धांत दिले. तुमची संस्कृति आणि निसर्गाप्रती प्रेमाने पूर्व आणि पश्चिमी अशा दोन्ही विचारांना प्रभावित केले आहे. तुमच्याकडे आध्यात्मिक समाधान आणि भौतिक संस्कृतिचा संगम आहे जो अन्य कुणाकडे नाही. मंगोलियाचे वेगाने धावणारे घोडे आणि शानदार तिरंदाजी आणि त्याला शांतिपूर्ण आध्यात्मिक परंपरा आणि ध्यानाची जोड तुमची  मानसिक आणि आध्‍यात्मिक उन्‍नति आणि क्षमता दर्शवते. आम्ही सर्वानी खरेच तुमच्याकडून खूप काही शिकले आहे

8. महामहिम, भारत, मंगोलिया सरकार आणि तिथल्या लोकांबरोबर काम करण्यासाठी वचनबद्ध आहे, जेणेकरून दोन्ही देशांच्या नागरिकांच्या समृद्धीसाठी आपली धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत आणि विस्तारता येऊ शकेल. 

9. महामहिम, भारतातील तुमचे वास्तव्य आनंदी राहो अशा मी शुभेच्छा देतो. मला विश्वास आहे की तुमचा भारत दौरा आपल्या ऐतिहासिक संबंधांमध्ये आणखी एक शानदार अध्याय जोडेल. महाबोधी वृक्षाच्या दिव्य सावलीत आपली मैत्री आणि समृद्धि बहरत राहो अशी मी प्रार्थना करतो.

धन्यवाद!  

 

R.Tidke/S.Kane/P.Kor



(Release ID: 1585760) Visitor Counter : 101


Read this release in: English