भारतीय निवडणूक आयोग

हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका तसेच विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसभा मतरदारसंघातील आणि राज्य विधानसभेतील रिक्त जागा भरण्यासाठी पोटनिवडणुक कार्यक्रमाची निवडणूक आयोगाने केली घोषणा

Posted On: 21 SEP 2019 5:11PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2019

 

हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका तसेच विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसभा मतरदारसंघातील  जागा आणि राज्य विधानसभेतील रिक्त जागा भरण्यासाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केला.

हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम

अधिसूचना जारी करण्याची तारीख                        - 27 सप्टेंबर 2019

उमेदवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस      - 4 ऑक्टोबर 2019

उमेदवारी अर्जाची छाननी                                       - 5 ऑक्टोबर 2019

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख         - 7 ऑक्टोबर  2019

मतदान तारीख                                                        - 21  ऑक्टोबर  2019

मतमोजणी                                                                - 24  ऑक्टोबर  2019

निवडणूक  प्रक्रिया पूर्ण                                             - 27 ऑक्टोबर  2019

हरियाणा विधानसभेच्या 90 जागा असून तिचा कार्यकाळ 2 नोव्हेंबर रोजी संपत आहे. तर महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा असून तिचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी संपत आहे. हरियाणा विधानसभेच्या 90 जागांपैकी 17 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत तर महाराष्ट्राच्या 288 जागांपैकी 29 जागा अनुसूचित जातींसाठी तर 25 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. 

हरियाणामध्ये 1,82,98,714 मतदार आहेत तर महाराष्ट्रात 8,95,62,706 मतदार आहेत.

हरियाणात 38  हजार तर महाराष्ट्रात 1.8 लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.

बिहारच्या समस्तिपूर लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या 15, उत्तर प्रदेशच्या 11, केरळच्या 5, आसाम, गुजरात, पंजाब आणि बिहारच्या प्रत्येकी 4, सिक्कीमच्या 3, राजस्थान, तामिळनाडू  आणि हिमाचल प्रदेशच्या प्रत्येकी 2, मध्य प्रदेश, मेघालय, पुदुच्चेरी आणि ओडिशाच्या प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुका देखील 21 ऑक्टोबरला घेण्यात येणार असून मतमोजणी 24 ऑक्टोबर रोजी होईल.

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे हरियाणा आणि महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. 

 

R.Tidke/S.Kane/P.Kor

 



(Release ID: 1585754) Visitor Counter : 234


Read this release in: English