संरक्षण मंत्रालय
हवेतून हवेत मारा करणाऱ्या ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची सु-30 एमकेआय विमानातून यशस्वी चाचणी
प्रविष्टि तिथि:
17 SEP 2019 5:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2019
हवेतून हवेत मारा करणाऱ्या ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची ओदिशा तटावर घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली. सु-30 एमकेआय विमानातून ही चाचणी घेण्यात आली. देशात प्रथमच विकसित करण्यात आलेल्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राने हवेतच लक्ष्य अचूक भेदले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल डीआरडीओ आणि हवाई दलाचे अभिनंदन केले आहे.
B.Gokhale/S.Kakade/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1585313)
आगंतुक पटल : 247
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English