गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
नागरीकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना-हरदीपसिंह पुरी
Posted On:
13 SEP 2019 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 सप्टेंबर 2019
नागरी विकासात, सार्वजनिक-खासगी भागीदारीवर आधारित लॅण्ड पुलींग धोरण हे मूलभूत परिवर्तन दर्शवत असल्याचे केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी म्हटले आहे. यामध्ये जमिनीचे तुकडे एकत्र करून खाजगी जमीनमालकाद्वारे ती विकसित करण्यात येते. समूह क्षेत्र विकास योजनेमध्ये विहित निकष आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार जमीनमालक/मालकांचा गट, कोणत्याही आकाराची जमीन पुलसाठी देऊ शकतो, असे ते म्हणाले.
लॅण्ड पुलींग संदर्भात नवी दिल्लीत आयोजित केलेल्या परिषदेत ते आज बोलत होते.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
(Release ID: 1585014)