गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

हरित उपक्रमासाठी भारतीय रेल्वे आणि भारतीय उद्योग महासंघ यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

Posted On: 13 SEP 2019 5:16PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर 2019

 

जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी भारताचे योगदान म्हणून भारतीय रेल्वेने काही हरित उपक्रम हाती घेतले आहेत. यासंदर्भात रेल्वे मंत्रालय आणि भारतीय उद्योग महासंघाने आज नवी दिल्लीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, भारतीय उद्योग महासंघाचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वच्छता ही जनचळवळ झाली आहे. रेल्वेचे 50 उत्पादन एककं, 12 रेल्वे स्थानकं, 16 इमारतीना हरित प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबद्दल रेल्वे राज्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. रेल्वेच्या आणखी उत्पादन विभागांना हे प्रमाणपत्र मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

उत्पादनात ऊर्जा कार्यक्षमता, रेल्वे मालमत्ता, हरित होण्यासाठी काम, खरेदीसाठी हरित धोरण विकसित करणे ही या सामंजस्य कराराची उद्दिष्ट आहेत.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1584998)
Read this release in: English