कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

भारतीय कौशल्य संस्थेचे केंद्रीय कौशल्य विकास मंत्री महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते मुंबईत भूमीपूजन

Posted On: 11 SEP 2019 6:10PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2019

 

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी आज मुंबईत भारतीय कौशल्य संस्थेचे भूमीपूजन केले. कौशल्याबाबत सर्वोत्तम म्हणून भारताचे जगात नाव व्हावे यादृष्टीने कौशल्य संस्था उभारण्यात येत आहे, असे ते म्हणाले. आजच्या गरजा लक्षात घेऊन आणि जगभरातल्या सुधारणांचा वेग लक्षात घेऊन या संस्थेत युवकांना कौशल्य प्रदान करण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीनंतर तंत्र शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण ही संस्था देणार आहे. यामुळे नव भारत आणि जागतिक बाजारपेठेसाठी ते रोजगार प्राप्त करू शकतील आणि उद्योगक्षेत्रासाठीही सज्ज होतील. सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर ही संस्था निर्माण करण्यात येणार असून टाटा एज्युकेशन डेव्हलपमेंट ट्रस्ट हा खाजगी भागीदार राहणार आहे.

दरवर्षी 5000 प्रशिक्षणार्थी यातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतील आणि त्यांच्यासाठी 70 टक्के रोजगाराच्या संधी उपलब्ध राहतील.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1584754) Visitor Counter : 189


Read this release in: English