पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून डॉ. पी.के.मिश्रा यांनी स्वीकारला पदभार
Posted On:
11 SEP 2019 4:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2019
पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून डॉ. प्रमोद कुमार मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज पदभार स्वीकारला.
डॉ. मिश्रा यांना कृषी, आपत्ती व्यवस्थापन, ऊर्जा, पायाभूत वित्तपुरवठा, नियामकविषयक बाबी विषयक कार्यक्रम व्यवस्थापनाचा अनुभव आहे. संशोधन, प्रकाशन, धोरण आखणे, कार्यक्रम/ प्रकल्प व्यवस्थापन यामध्येही त्यांची उत्तम कारकीर्द आहे. धोरण निर्मिती आणि प्रशासनामधला त्यांना दांडगा अनुभव आहे.
पंतप्रधानांचे अतिरिक्त प्रधान सचिव, केंद्रीय कृषी आणि सहकारी सचिव, राज्य विद्युत नियामक आयोगाचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषवली आहेत. केंद्रीय कृषी आणि सहकारी विभागाचे सचिव म्हणून काम पाहताना राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रम, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान यांसारख्या महत्वाच्या राष्ट्रीय उपक्रमासाठी त्यांचा सक्रीय सहभाग होता.
2014-19 या काळात पंतप्रधानांचे अतिरिक्त प्रधान सचिव म्हणून काम पाहताना मनुष्यबळ व्यवस्थापनात विशेषत: वरिष्ठ पदांवरच्या नियुक्त्यांमध्ये नाविन्यता आणि उत्तम परिवर्तन घडवण्याचे श्रेय मिश्रा यांच्याकडे जातं.
इंन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज (ब्रिटन) एडीबी आणि जागतिक बँकेच्या प्रकल्पांची अंमलबजावणी यासह त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अनुभव आहे.
आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या साकवा (एसएएसएकेएडब्ल्यूए) पुरस्कार 2019ने मिश्रा यांना गौरवण्यात आले आहे.
मिश्रा यांनी ससेक्स विद्यापीठातून अर्थशास्त्र/डेव्हलपमेंट स्टडिजमध्ये पीएचडी प्राप्त केली आहे. ससेक्स विद्यापीठातून डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समध्ये एमए, तसेच दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रातली एमए ही पदवी त्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
(Release ID: 1584725)
Visitor Counter : 216