गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सिल्वासा येथे विविध सार्वजनिक प्रकल्पांचे उद्घाटन


कलम 370 रद्द केल्या नंतर काश्मीरमध्ये संपूर्ण शांतता, एकही गोळी चालली नाही. कोणतीही मनुष्य हानी नाही – गृहमंत्री अमित शाह.

देशातील सर्व घरांपर्यंत 2022 पर्यंत नळाने पाणी पुरवठा होणार – अमित शाह.

कलम 370 आणि 35अ रद्द केल्याने जम्मू आणि काश्मीरचे भारताशी संपूर्ण एकात्मीकरण शक्य झाले – अमित शाह

राजकारणाच्या पलिकडे जात राष्ट्रीय सुरक्षा आणि एकात्मतेसाठी एकत्र उभे राहुया : अमित शाह

Posted On: 01 SEP 2019 7:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2019

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज सिल्व्हासा येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन झाले. एकून 290 कोटी रुपयांचे विविध प्रकल्प देशाला समर्पित करतांना अमित शाह यांनी समाधान व्यक्त केले.

देशात 2014 साली नरेंद्र मोडी पंतप्रधान झाल्यानंतरच सिल्व्हासाचा खऱ्या अर्थाने विकास झाला असं शाह ह्यावेळी म्हणाले. गेल्या पाच वर्षात दादरा आणि नगर हवेली ह्या केंद्र शासित प्रदेशातही पाणी वीज सार्वजनिक स्वच्छता आणि स्वयंपाकाच्या गैसची सुविधा घरोघरी पोहोचली, असंही त्यांनी सांगितलं.

शाह यांनी ह्या वेळी अक्षयपात्र फौंडेशनच्या मध्यान्ह भोजन वाहनांच्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे केंद्र शासित प्रदेशातील विद्यार्थ्यांच्या आरोग्यात आणि पोषण मूल्यात शुदार्ण होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

शाह यांनी श्रमयोगी प्रसाद योजने विषयीही समाधान व्यक्त केलं. या योजने अंतर्गत कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी माफक दारात पोषक आहार उपलब्ध होणार आहे.

नमो वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या शैक्षणिक वर्षातच 150 पेक्षा अधिक डॉक्टर्स तयार केले जातील असे सांगत, या महाविद्यालयामुळे आसपासच्या भागातल्या वैद्यकीय गरजांची पूर्तता होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पाण्याशी संबंधित समस्यांवर सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी सरकारने जलशक्ती मंत्रालय सुरु केलं आहे असं सांगत, या निर्णयाचे लाभ नजीकच्या भविष्यात दिसू लागतील, असं शाह म्हणाले.

देशातील 14 कोटी घरांमध्ये पाणी पुरवठा व्हावा यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात साडे तीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. देशातल्या प्रत्येक घरात 2022 पर्यंत पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं गृह मंत्री म्हणाले. पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे 130 कोटी भारतीयांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडेल असं शाह यांनी सांगितलं.

प्लास्टिकचा वापर आणि त्याचा पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम यावरही त्यांनी भाष्य केले. या समस्येवर मात करण्यासाठी  महिलांनी प्लास्टिकऐवजी कापडासारख्या पर्यायी पिशव्यांचा वापर करावा,असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मोहिमेला प्लास्टिकमुक्तीमुळे बळ मिळेल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कलम 370 आणि 35अ रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे जम्मू काश्मीरचे भारतासोबत संपूर्ण एकात्मीकरण शक्य झाले आहे. असं शाह म्हणाले. या निर्णयामुळे काश्मीर खोऱ्याचा विकास होईल आणि दहशतवादाचा अंत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कलम 370 हटविल्यापासून काश्मीरमध्ये संपूर्ण शांतता आहे, असं त्यांनी सांगितलं. या निर्णयानंतर जम्मू काश्मीरमध्ये एकही गोळी चाललेली नाही आणि एकही व्यक्तीचा बळी गेलेला नाही. अशी माहिती त्यांनी दिली.

कलम 370 हटविण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांनी राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन देशाची सुरक्षा आणि एकात्मतेसाठी एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलं.

यावेळी अमित शाह यांच्या हस्ते सिल्वासा शैक्षणिक संकुल आणि निम वैद्यकीय इमारतीचा पायाभरणी समारंभही झाला. या केंद्रशासित प्रदेशाच्या नव्या पर्यटन धोरणाचं त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. तसंच मध्यान्ह भोजन वाहनाला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि युवा वसतिगृह तसंच श्रम योगी प्रसाद योजनेचं उद्घाटन केलं. या योजने अंतर्गत कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी माफक दारात पोषक आहार उपलब्ध होणार आहे. यावेळी व्यासपीठावर प्रफुल्ल पटेल, दादरा आणि नगर हवेलीचे प्रशासक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

 

D.Wankhede/R.Aghor/D.Rane


(Release ID: 1583806) Visitor Counter : 352


Read this release in: English